scorecardresearch

पत्नीचं शतक पूर्ण होताच तणावात असलेल्या मिचेल स्टार्कच्या चेहऱ्यावर हसू, VIDEO पाहा…

न्युझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज एलिसा हिलीने (Alyssa Healy) दमदार शतकी खेळी केली.

Alyssa Healy and Mitchell Starc: न्युझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ३५७ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज एलिसा हिलीने (Alyssa Healy) दमदार शतकी खेळी केली. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी एलिसाचा पती आणि दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क देखील उपस्थित होता. यावेळी काळ मिचेलच्या चेहऱ्यावर तणाव दिसला, मात्र पत्नीने शतक झळकावताच मिचेलच्या चेहऱ्यावर हसू उमटले. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मिचेल स्टार्क महिला विश्वचषकच्या अंतिम सामन्यात पत्नी एलिसा हिली आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी न्यूझीलंडला पोहचला होता. सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना ३५ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्क काहिसे गंभीर आणि चिंतातूर दिसले. यावेळी त्याची पत्नी एलिसा ९९ धावांवर फलंदाजी करत होती. एलिसाला महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावण्यासाठी केवळ एका धावाची गरज होती. त्यामुळेच मिचेलच्या मनातील धाकधूक वाढली होती.

मिचेलची धाकधूक वाढली असली तरी दिग्गज फलंदाज एलिसाने कोणत्याही अडचणीशिवाय इंग्लंडची गोलंदाज श्रबसोलच्या षटकात एक धाव पूर्ण केली आणि आपलं शतक पूर्ण केलं. यानंतर लगेचच मिचेलच्या चेहऱ्यावरील तणाव दर होऊन चेहऱ्यावर हास्य उमटलं. यावेळी मिचेलने टाळ्या वाजवत एलिसाच्या शतकावर आनंद व्यक्त केला. त्याची ही रिअॅक्शन कॅमेरात कैद झाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा विश्वचषकावर कोरलं नाव, अंतिम सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव

एलिसा हिलीने या सामन्यात केवळ शतकच केलं नाही, तर २६ चौकार लगावत १७० धावांची दमदार खेळी केली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला ३५७ धावांचा डोंगर उभा करता आला. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या नाकीनऊ आले आणि ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव केला.

मराठीतील सर्व Cricket ( Cricket ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mitchell starc smile after wife alyssa healy make century in womens cricket world cup 2022 final pbs

ताज्या बातम्या