दीपक चहर करणार ‘या’ बिग बॉस स्पर्धकाच्या बहिणीशी लग्न?

दीपक आयपीएल २०२१ नंतर साखरपुडा करणार…

deepak chahar, sidharth bharadwaj, jaya bharadwaj,
दीपक आयपीएल २०२१ नंतर साखरपुडा करणार?

क्रीडा आणि मनोरंज क्षेत्राच एक वेगळ नातं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मापासून गीता बसरा पर्यंत अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्न केलं आहे. एवढंच नाही तर आता अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या रिलेशनशिपच्या ही चर्चा सुरुच आहेत. यातच आता क्रिकेटर दीपक चहर आणि ‘बिग बॉस’ फेम सिद्धार्थ भारद्वाजची बहिण जया भारद्वाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. एवढंच नाही तर ते दोघे लवकर लग्न करणार आहेत.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दीपक चहर आणि जया यांचा लवकरच रोका होणार आहे. एवढंच नाही तर २०२१ च्या आयपीएलनंतर ते साखरपुडा ही करणार आहेत. तर दुबईला होणाऱ्या आयपीएल मॅचसाठी जया ही दीपकसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@theaslisidharth)

आणखी वाचा : अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ आता काय करतात?

दीपक आणि जया यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की दीपकने जयाची संपूर्ण टीमशी भेट घेतली आहे. तर हे पाहता दीपक त्याच्या टीममध्ये असलेले खेळाडू युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या प्रमाणे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. जया ही दिल्लीची असून एका कॉर्पोरेट कंपनीत काम करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

आणखी वाचा : करिश्मा आणि करीनाच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते- रणधीर कपूर

दीपक चहरची बहिण मालती चहर ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तर जयाचा भाऊ सिद्धार्थचे लाखो चाहते आहेत. सिद्धार्थ बिग बॉस ५ आणि स्पिल्टिस्टव्हिला या शोमध्ये दिसला होता. दीपकने बांग्लादेश विरोधात ७ रन देत ६ विकेट घेतल्या होत्या. तर ICC ने त्याला T20 परफॉर्मेंस ऑफ द इयर हा अवॉर्ड दिला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cricketer deepak chahar dating bigg boss fame sidharth bharadwaj s sister jaya couple know more dcp