अथिया शेट्टीच्या भावासोबत केएल राहुलची सैर! फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

क्रिकेटपटू केएल राहुलनं अथिया शेट्टीच्या भावासोबत लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. लंडनमधील रस्त्यावर फिरत असल्याचे हे फोटो आहेत.

KL-Rahul-With-Ahan-Shetty
अथिया शेट्टीच्या भावासोबत केएल राहुलची सैर! फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स (Photo-KL Rahul Instagram)

क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांचं नातं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोघं एकमेकांवर प्रेम करत असल्याचा अफवाही उडत आहेत. दोघंही नेहमी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. मात्र या दोघांनी कोणत्याही नात्याबाबत अद्यापही अधिकृतपणे सांगितलेलं नाही. आता केएल राहुलनं अथिया शेट्टीच्या भावासोबत लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. लंडनमधील रस्त्यावर फिरत असल्याचे हे फोटो आहेत. केएल राहुल आणि अहानची चांगली गट्टी जमल्याचं या फोटोतून दिसत आहे.

केएल राहुल याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत “हॅप्पी वाइब्स” असं लिहिलं आहे. त्यासोबत अहान शेट्टीला फोटो टॅग केले आहेत. यानंतर या पोस्टवर नेटकऱ्यांची कमेंट्स देण्यासाठी झुंबड उडाली आहे. नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मेहुणे सोबत का?”, असं एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे. तर एकाने ‘जीजा-साला एक साथ’, असं लिहिलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी अथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर क्रिकेटरसोबत स्टायलिश फोटो शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul (@rahulkl)

केएल राहुलने अहानसोबत लंडनमधील रस्त्यावर सैर करताना दिसले. मात्र यावेळी केएल राहुलने चेहरा मास्कने झाकला होता. यात केएल राहुल काळ्या कपड्यात ऑरेंज कॅप घालून फिरताना दिसला. दुसरीकडे अथियाने आपला सोलो फोटो शेअर केला आहे. लंडनमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. अथिया आणि केएल राहुल यांनी नुकतेच एका ब्राँडसाठी प्रमोशनल फोटोशूट केलं होतं. दोघांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cricketer kl rahul share photo with ahan shetty on instagram rmt

Next Story
विजयी भव !