scorecardresearch

VIDEO : मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर झाला अल्लू अर्जुनचा दिवाना, Srivalli गाण्यावर केला भन्नाट डान्स!

‘पुष्पा’ चित्रपटातील या गाण्यानं सर्वांना वेड लावलं आहे.

cricketer rahul chahars dance on pushpa song srivalli video viral
मुंबई इंडियन्सचा खेळाडू राहुल चहरनं श्रीवल्ली गाण्यावर केला डान्स

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर अनेकांनी त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना यांच्यासोबत आता भारतीय क्रिकेटर राहुल चहरचे नावही जोडले गेले आहे. फिरकीपटू राहुल चहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो ‘श्रीवल्ली’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या अभिनेता अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. राहुल चहरने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘अल्लू अर्जुनचा चाहता मुलगा’ असे लिहिले आहे.

हेही वाचा – VIDEO : आधी वॉर्नर, आता रैना..! ‘पुष्पा’तील ‘Srivalli’ गाण्यावर केला डान्स; अल्लू अर्जुन म्हणाला…

राहुलने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एक वनडे आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ७० विकेट घेतल्या आहेत. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी नामिबियाविरुद्ध दुबईत खेळला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricketer rahul chahars dance on pushpa song srivalli video viral adn

ताज्या बातम्या