scorecardresearch

Premium

Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…

नुकतंच ऋतुराजच्या पत्नीचं नाव समोर आलं आहे.

Ruturaj Gaikwad wife
ऋतुराज गायकवाड पत्नी

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे ऋतुराजच्या खेळामुळे तो प्रसिद्धीझोतात आहे. तर दुसरीकडे ऋतुराज हा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे त्याची पत्नी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतंच ऋतुराजच्या पत्नीचं नाव समोर आलं आहे.

आयपीएलच्या १६ व्या हंगामातील महाअंतिम सोहळ्यापूर्वी ऋतुराज गायकवाडने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ३ ते ४ जूनदरम्यान ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या फायनलनंतर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकावं लागणार आहे. ऋतुराजच्या जागी यशस्वी जयस्वालची टीम इंडियामध्ये वर्णी लागली आहे.
आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना त्याची पत्नी कोण, असा प्रश्न पडला आहे. नुकतंच याचे उत्तर समोर आलं आहे. ‘इनसाइडर स्पोर्ट्स डॉट इन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव उत्कर्षा पवार असे आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना ओळखतात. ते अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. गेल्यावर्षी उत्कर्षा आणि ऋतुराज एकत्र जिममध्ये दिसले होते. त्यांनी याचा एक फोटोही शेअर केला होता. त्यानंतर त्यांचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

आणखी वाचा : “गेल्यावर्षी जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा फक्त सावरकरांना…” केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

उत्कर्षा पवार ही एक क्रिकेटपटू आहे. उत्कर्षाचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला. तिचं बालपण पुण्यात गेलं आहे. ती २४ वर्षांची आहे. उत्कर्षा आणि ऋतुराज एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत असल्याचे बोललं जात आहे. पण त्या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केलेली नाही. त्यामुळे ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव उत्कर्षा आहे की नाही, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricketer ruturaj gaikwad marriage going to marry utkarsha pawar will tie the knot in june nrp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×