भारताचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. के.एल. राहुल पाठोपाठ शार्दुलने लग्नाच्या बेडीत अडकून त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. शार्दुलने गर्लफ्रेंड मिताली पारुलकरबरोबर २७ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. मुंबईत मराठी परंपरेनुसार त्यांचा विवाहसोहळा पार पडला. शार्दुल ठाकूरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शार्दुलच्या फोटोंबरोबरच त्याच्या लग्नातील काही व्हिडीओही तुफान व्हायरल झाले होते. आता शार्दुलचा लग्नानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिताली पारुलकरबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर शार्दुलने तिच्यासाठी खास मराठीतून उखाणाही घेतला. याचा व्हिडीओ भास्कर घाणेकर या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. “बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावतो क्विक…मिताली आमची सुंदरतेचं प्रतीक” हा स्पेशल क्रिकेट स्टाइल उखाणा शार्दुलने मितालीसाठी घेतला.

fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित
myra vaikul sukanya mone and supriya pathare dance on nach ga ghuma
“नाच गं घुमा कशी मी नाचू…”, छोट्या मायराचा सुकन्या मोने अन् सुप्रिया पाठारेंसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
ranbir kapoor recalls when he gifted neetu kapoor jewellery to his girlfriends
Video : आईचे दागिने अन् बहिणीचे…; रणबीर कपूर गर्लफ्रेंडला काय गिफ्ट द्यायचा? खुलासा ऐकून भर कार्यक्रमात पिकला हशा

शार्दुल-मितालीने नोव्हेंबर २०१९ मध्ये साखरपुडा केला होता. त्यांच्या लग्नाला क्रिकेटमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, अभिषेक नायर आणि मुंबई संघाचा स्थानिक सिद्धेश लाडदेखील उपस्थित होते. लग्नापूर्वी संगीत समारंभ आणि हळदी समारंभही आयोजित करण्यात आले होते. केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर या वर्षी लग्न करणारा शार्दुल ठाकूर हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.

३१ वर्षीय शार्दुल ठाकूरने आतापर्यंत भारतासाठी आठ कसोटी, ३४ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान शार्दुलने कसोटीत २७, एकदिवसीय सामन्यात ५० आणि टी-२० मध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शार्दुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. शार्दुल आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.