scorecardresearch

VIDEO : वडिलांनी जोरात वाजवली कानाखाली..! शिखर धवनसोबत घडली ‘मोठी’ घटना; पाहा नक्की झालं काय

सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO

cricketer shikhar dhawan father slaps him watch viral video
शिखर धवनला बसली कानाखाली!

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. तो अनेकदा त्याचे फोटो-व्हिडिओ शेअर करत राहतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. यावेळी त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत शिखरचे वडील त्याच्या कानाखाली वाजवताना पाहायला मिळते.

या व्हिडिओमध्ये शिखर आपल्या वडिलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा एक जाणूनबुजून केलेला व्हिडिओ आहे. या व्हिडिओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक यूजर्सनी लाइक केले आहे. व्हिडिओमध्ये धवनचे वडील त्यांच्या खोलीतून बाहेर येतात आणि पंजाबीमध्ये विचारतात, तू आत फिरत आला आहेस का? यावर धवन मजेशीरपणे विचारतो, “वॉरंट लाए? क्या सबुत है आपके पास?” यावर त्याचे वडील त्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, “चल अंदर और पोछा लगा.”

हेही वाचा – ‘‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या…”, ख्रिस गेलनं दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शिखर धवन भारताच्या वनडे संघाचा भाग होता. त्याने वनडे मालिकेतील दोन सामन्यात अर्धशतके झळकावली. पार्लमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ७९ धावा केल्या होत्या, तर केपटाऊनमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ६१ धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय संघ या मालिकेत एकही वनडे जिंकू शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricketer shikhar dhawan father slaps him watch viral video adn

ताज्या बातम्या