भारताच्या सलामीवीर फलंदाजाचं झालं ब्रेकअप..? सोशल मीडिया पोस्टमुळं चर्चेला उधाण!

भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजाचं ब्रेकअफ झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Team-India-Virat-Kohli-India-vs-England-3rd-ODI
भारताच्या सलामीवीर फलंदाजाचं झालं ब्रेकअप..? सोशल मीडिया पोस्टमुळं चर्चेला उधाण! (Photo- PTI)

भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजाचं ब्रेकअफ झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. क्रिकेटपटू शुबमन गिल टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात नाही. मात्र सध्या त्याची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सकडून खेळणारा शुबमन गिल सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. शुबमन गिलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून एक फोटो शेअर केला आहे आणि फॅन्सना मॅसेज दिला आहे. त्यानंतर त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलं आहे. शुबमन गिलचं ब्रेक झालं का? असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. शुबमन गिलचं आणि सारा तेंडुलकरच्या यांच्यात काही असल्याच्या बातम्यांना सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात उधाण आलं होतं.

शुबमन गिलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत कॅप्शन लिहिली आहे. “सिग्मा रुल नंबर १”, अशी कॅप्शन दिली आहे. ही कॅप्शन लिहिण्यामागचा हेतू असा कि, शुबमनने शेअर केलेल्या फोटोतील टीशर्टवर “परींच्या प्रेमात पडू नका’, असं लिहिलं आहे. शुबमन गिलची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी आपल्या अंदाजात यावर कमेंट्स करत आहेत.

सारा तेंडुलकर इन्स्टाग्रामवर शुबमन गिल आणि त्याच्या बहिणीला फॉलो करते. तसेच सारा आणि शुबमन गिल अनेकदा एकमेकांच्या पोस्टला लाईक्स करतात. तसेच कमेंट्सही लिहितात. त्यामुळे नेटकरी या दोघांमध्ये काही तरी असल्याचं सांगत आहेत. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणीही भाष्य केलेलं नाही.

क्या बात..! टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर राहुल द्रविडची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “पुढील दोन वर्षात…”

२२ वर्षीय शुबमन गिल भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळला आहे. तसेच टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात डेब्यू केलेलं नाही. शुभमननं ८ कसोटी सामन्यात ४१४ धावा केल्या आहेत. तर ३ एकदिवसीय सामन्यात ४९ धावा केल्या आहेत. शुभमनचा फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cricketer shubman gill breakup news after social post rmt

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या