Umesh Yadav’s father passes away: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादवच्या वडिलांचे बुधवारी (२२ फेब्रुवारी) निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. उमेश यादवचे वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखले करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी आणण्यात आले होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उमेश यादव सध्या भारतीय कसोटी संघात आहे, जो ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर मालिका खेळत आहे.

उमेश यादव बॉर्डर गावसकर मालिकेतून बाहेर?

उमेश यादवच्या वडिलांच्या निधनानंतर तो बॉर्डर गावस्कर मालिकेचा भाग राहण्याची शक्यता कमी आहे. तो लवकरच संघाबाहेर जाऊ शकतो. उमेश यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नाही. तसेच फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या पाहता पुढील सामन्यांमध्येही तो स्थान मिळवू शकणार नाही अशी अपेक्षा आहे.

Mumbai Indians vs Chennai Super Kings match update in marathi
MI vs CSK : विराट-रोहितला जे जमलं नाही, ते ४२ वर्षीय धोनीने करुन दाखवलं, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

हेही वाचा – Saudi Arabia Foundation Day: सौदीच्या पारंपारिक पोशाखात तलवारी घेऊन नाचताना दिसला Cristiano Ronaldo, पाहा VIDEO

वेगवान गोलंदाज उमेश यादवने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. उमेश यादवने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण ७ बळी घेतले. यानंतर तो रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भ विरुद्ध पंजाब सामन्यात खेळला. तो सामना अनिर्णित असला तरी त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. यानंतर, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला, परंतु येथे खेळण्याची संधी मिळाली नाही.

हेही वाचा – IPL 2023: सनरायझर्स हैदराबादचा मोठा निर्णय; कर्णधारपदी ‘या’ धडाकेबाज खेळाडूची केली निवड

उमेशने भारताकडून ५४ कसोटी सामन्यात १६५ बळी घेतले आहेत. उमेश मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा नियमित सदस्य नाही. तो २०१८ मध्ये शेवटचा वनडे आणि गेल्या वर्षी टी-२० सामना खेळला होता.

शेवटच्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.