scorecardresearch

Virat Kohli Interview: कोण आहे ‘ती’ व्यक्ती? जिच्यासोबत विराटला जायचं होतं डिनरला; आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही इच्छा, पाहा VIDEO

Virat Kohli Interview: एका ब्रँड प्रमोशन व्हिडिओ दरम्यान विचारलेल्या काही मनोरंजक प्रश्नांची उत्तरे देताना, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने देखील त्या व्यक्तीचा खुलासा केला ज्याच्यासोबत तो एका बेटावर एकटा वेळ घालवू इच्छितो. विराट कोहलीने विचारलेल्या इतर प्रश्नांची दिली आहेत.

Virat Kohli Interview Updates
विराट कोहली (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत एकूण ४ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत, या मालिकेसाठी विराट कोहली टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या आहेत. या मालिकेपूर्वी विराट कोहलीने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कोहलीला एक प्रश्न विचारला जातो, ‘तो कोणत्या ऐतिहासिक महिलेसोबत डिनरला जायला आवडेल?’ या प्रश्नावर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराटने दिलेले उत्तर ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

विराट कोहलीने लता मंगेशकर यांचे नाव घेतले –

यावर विराट कोहली म्हणाला की, ”मी लता मंगेशकर यांना कधीही भेटू शकणार नाही. ज्याचा मला आयुष्यभर पश्चाताप होईल. त्याच्याशी बसून बोलता आले असते, तर ते संस्मरणीय ठरले असते. मी त्यांच्यासोबत बसून त्याच्या जीवनाबद्दल बोललो असतो आणि त्यांचा करिष्माई प्रवास कसा होता. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता.”

विराट कोहली हा लता मंगेशकर यांचा चाहता आहे –

विराट कोहली महान गायिका लता मंगेशकर यांचा मोठा चाहता आहे. आता लता दीदी या जगात नाहीत. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. याआधीही विराटने सांगितले आहे की, त्याला लता मंगेशकर यांची गाणी ऐकायला आवडतात.

हेही वाचा – Coaching Beyond Book: संतापलेल्या महेंद्रसिंग धोनीने संपूर्ण संघाला दिला होता अल्टिमेटम; ”विश्वचषक खेळायचा असेल तर…”

२५ पेक्षा जास्त भाषांमध्ये गायली गाणी –

लता मंगेशकर यांनी देश-विदेशातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्यांनी सर्वाधिक गाणी गाण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले.

हेही वाचा – Sam Curran Fined: IPLच्या सर्वात महागड्या खेळाडूला ICCने ठोठावला दंड; टेंबा बावुमाविरुद्धची ‘ती’ कृती भोवली

विराट कोहलीली विचारण्यात आलेली इतर प्रश्नावली –

प्रश्न: १६ वर्षीय विराट कोहलीला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता?
विराट कोहली: जगाला थोडे अधिक जाणून घ्या, थोडे अधिक मन मोकळे करा आणि दिल्लीबाहेर जीवन आहे हे स्वीकारा.
प्रश्न: तुम्हाला सर्वात जास्त आनंद देणारे ठिकाण कोणते आणि कुठे आहे?
विराट कोहली: मी माझ्या घरी सर्वात आनंदी आहे.
प्रश्न: तुम्ही आजपर्यंतचा सर्वात विचित्र पदार्थ कोणता आहे?
विराट कोहली: वयाच्या २५… २४ व्या वर्षापर्यंत… हा माझ्या आतापर्यंतचा सर्वात विचित्र आहार होता. म्हणजे मी अक्षरशः जगातील सर्व जंक फूड खाल्ले आहे. त्यामुळे तो विचित्र आहार घेणे माझ्यासाठी सामान्य होते.
प्रश्न: कुटुंबाव्यतिरिक्त, तुम्हाला बेटावर कोणासह वेळ घालवायला आवडेल?
विराट कोहली: कुटुंबाशिवाय… मुहम्मद अली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 15:21 IST
ताज्या बातम्या