वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून डॉर्टमंड आणि मॅंचेस्टर युनायटेड यांच्यापैकी कुणीच अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

‘‘रोनाल्डो खेळाडू म्हणून मला आवडतो. रोनाल्डोला डॉर्टमंडकडून खेळताना पाहायलाही मला आवडेल. पण त्याला करारबद्ध करण्याच्या दिशेने आम्ही अजून योग्य पाऊल टाकलेले नाही,’’ असे बोरुसिया डॉर्टमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी हन्स जोशिम वॅटझके यांनी म्हटले आहे.

Grill coriander garlic fish recipe in marathi
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश; असा बनवा कुरकुरीत मसाला फिश फ्राय
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?

या वर्षी जुलैपासूनच रोनाल्डो मॅंचेस्टर युनायटेड सोडून नव्या क्लबशी करारबद्ध होणार अशी फुटबॉलविश्वात चर्चा केली आहे. रोनाल्डोचा व्यवस्थापक जॉर्ज मेंडिसनेच चेल्सी, अ‍ॅटलेटिको माद्रिद, नेपोली आणि बायर्न म्युनिक रोनाल्डोला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती दिली होती.

रोनाल्डोच्या क्लब सोडण्याविषयी अजून कुठलीच हालचाल झालेली दिसून येत नाही. खेळाडूंच्या संघबदलाची मुदत १ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे रोनाल्डोच्या नव्या संघाची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. यात चालू आठवडय़ात डॉर्टमंड रोनाल्डोला घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समोर आल्याने या चर्चेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.