पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड सोडून सौदी अरेबियाच्या अल नासर फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तो या क्लबमध्ये सामील होणार असल्याची माहिती आधीच आली होती, पण आता क्लबने अधिकृत माहिती देऊन याची पुष्टी केली आहे. रोनाल्डोचा करार किती वर्षासाठी आहे आणि रोनाल्डोला एका वर्षासाठी भारतीय चलनात किती पैसे मिळतील जाणून घेऊया.

अल नासरने अधिकृत घोषणा करताना एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये लिहले की, ”हा एक असा करार आहे, जो केवळ आमच्या क्लबलाच नव्हे तर आमच्या देशाला, येणाऱ्या पिढ्यांना, मुले आणि मुलींना सर्वोत्तम बनण्यासाठी प्रेरित करेल. नवीन घरात रोनाल्डोचे स्वागत आहे.”

Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
future players in indian cricket team
विश्लेषण : टीम इंडिया ‘जनरेशन नेक्स्ट’ कशी असेल?
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती

कितीमध्ये झाला करार –

रिपोर्टनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डोने नवीन क्लबसोबत २०२५ पर्यंत करार केला आहे. रोनाल्डोला वर्षाला २०० दशलक्ष युरोमध्ये करारबद्ध केले आहे. जर आपण भारतीय चलनात त्याचे मूल्य मोजले तर रोनाल्डोला एका वर्षात १७ अब्ज रुपये (१७७५०७१३२२४) पेक्षा जास्त मिळतील. म्हणजे १७०० कोटी (ख्रिस्तियानो रोनाल्डोचे वार्षिक उत्पन्न) रुपये, जे जगातील कोणत्याही खेळाडूचे सर्वात जास्त मानधन असेल.

अडीच वर्षांचा करार –

पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने अल नासरसोबत २०२५ पर्यंत करार केला आहे. हा करार अडीच वर्षांसाठी आहे. त्याला क्लबकडून दरवर्षी सुमारे १७०० रुपये मिळतील. यात एंडोर्समेंट देखील समाविष्ट आहे. दुसरीकडे, लिओनेल मेस्सीला पॅरिस सेंट जर्मेनमधून दरवर्षी सुमारे ३५० कोटी रुपये मिळतात. म्हणजेच रोनाल्डोचा पगार मेस्सीपेक्षा जवळपास ५ पट जास्त आहे. या अगोदर ख्रिस्तियानो रोनाल्डोने जुव्हेंटस सोडले आणि त्याचा माजी क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला होता. परंतु काही काळापूर्वी रोनाल्डोने वादानंतर हा क्लब सोडला.

३७ वर्षीय रोनाल्डोने नवीन करारानंतर सांगितले की, तो वेगळ्या देशात नवीन फुटबॉल लीग खेळण्यासाठी उत्साहित आहे. स्पेनच्या मोठ्या फुटबॉल क्लब रिअल माद्रिदसोबतही तो बराच काळ खेळला असल्याची माहिती आहे.

आता आशियाची पाळी –

रोनाल्डो म्हणाला की, मी युरोपियन फुटबॉलमध्ये जे काही करायचे ठरवले होते, ते साध्य करण्यासाठी मी भाग्यवान आहे. आता मला वाटते की आशियातील माझा अनुभव शेअर ही योग्य वेळ आहे. अल नासरबद्दल सांगायचे तर, त्याने सौदी अरेबिया प्रो-लीगचे विजेतेपद ९ वेळा जिंकले आहे.