IPL 2026 CSK vs KKR Match Highlights in marathi: सीएसकेने केकेआरचा पराभव करत चेपॉकचा गड राखला आहे. कोलकाता नाईट रायडर्सला या स्पर्धेतील चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. केकेआरला अद्याप स्पर्धेत विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत केकेआरच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडत धावांनी ३२ विजय मिळवला.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने या पराभवासह स्पर्धेतील चौथा पराभव नोंदवला आहे. केकेआरचा पंजाब किंग्सविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने संघाने एका गुणासह खातं उघडलं. पण विजय मात्र संघ मिळवू शकला नाही. तर चेन्नई संघाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.

सीएसकेने दिलेल्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात खराब झाली. फिन एलन १ धावा करत बाद झाला. यानंतर सुनील नरेन २४ धावा, अजिंक्य रहाणे २८ धावा आणि अंगक्रिश रघुवंशीने २७ धावांचं योगदान दिलं. यानंतर रिंकू सिंग ६ धावा तर कॅमेरू ग्रीन गोल्डन डकवर बोल्ड झाला. यानंतर रोव्हमन पॉवेल आणि रमणदीप सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. रमणदीप सिंग ३५ धावा करत झेलबाद झाला. तर रोव्हमन पॉवेल ३१ धावा करत नाबाद परतला. यासह केकेआरचा संघ २० षटकांत ७ बाद १६० धावाच करू शकला. सीएसकेकडून नूर अहमदने ३ विकेट्स आणि अंशुल कंबोजने २ विकेट्स घेतल्या. तर खलील अहमद व अकील हुसैन यांनी १-१ विकेट्स घेतल्या.

कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम नाणेफेक जिंकत चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केलं. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि ७ धावा करत बाद झाला. तर संजू सॅमसन व आयुष म्हात्रेच्या जोडीने चांगली फटकेबाजी संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. संजू सॅमसन ४८ धावांत बाद झाल्याने त्याचं अर्धशतक हुकलं. तर आयुष म्हात्रे १७ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा करत बाद झाला. यानंतर डेवाल्ड ब्रेविसने २९ चेंडूत धटपट ४१ धावांची खेळी केली. तर सर्फराझने २३ आणि शिवम दुबेने १३ धावांचं योगदान दिलं आणि संघाला २० षटकांत ५ बाद १९२ धावा केल्या.

केकेआरकडून कार्तिक त्यागीने २ विकेट्स तर वैभव अरोरा, अनुकूल रॉय व सुनील नरेन यांनी १-१ विकेट्स घेतल्या,