MS Dhoni Miss IPL Match: एम एस धोनी आयपीएल २०२६ मधील चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीच्या सामन्यात खेळताना दिसणार नाहीये. चेन्नई सुपर किंग्स सलामीचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध खेळत आहे. या सामन्यात गेली अनेक वर्षे सातत्याने खेळत असलेला संघाता यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनी मात्र खेळताना दिसणार नाही. चेन्नई फ्रँचायझी सध्या स्थित्यंतराच्या काळातून जात आहे. पूर्वी अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी ओळखला जाणारा हा संघ आता तरुण खेळाडूंमध्ये गुंतवणूक करत आहे. भविष्य लक्षात घेऊन, चेन्नई संघाने या हंगामासाठी एक तरुण संघ तयार केला आहे.

आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडेल की चेन्नईचा संघ एम.एस. धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय खेळेल. २००८ मध्ये जेव्हा चेन्नई सुपर किंग्स अस्तित्त्वात आली, तेव्हा आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्या सुरुवातीला, दोन खेळाडू संघाचे सर्वात मोठा चेहरा मानले जात होते. हे दोन भारतीय फलंदाज होते सुरेश रैना आणि एम.एस. धोनी. मॅथ्यू हेडन, मायकल हसी, मुथय्या मुरलीधरन, डग बोलिंगर, अल्बी मॉर्केल आणि शेन वॉटसन यांच्यासह अनेक खेळाडू आयपीएलमध्ये सुपर किंग्सकडून खेळले असले तरी, हे दोन भारतीय दिग्गज ‘थाला’ आणि ‘चिन्ना थाला’ म्हणून सीएसकेच्या चाहत्यांच्या हृदयात नेहमीच कोरले गेले आहेत.

या दोन्ही भारतीय दिग्गजांशिवायचा पहिलाच हंगाम असेल. रैनाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर धोनी हंगामाच्या सुरुवातीला अनुपलब्ध असेल. गेल्या काही वर्षांत, एम.एस. धोनी आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक बनला आहे. त्याने या लीगमध्ये २७८ सामने खेळले असून १०० डावांमध्ये नाबाद राहण्याचा अनोखा विक्रम त्याच्या नावावर आहे. या काळात धोनीने ३८.३० च्या सरासरीने आणि सुमारे १३८ च्या स्ट्राइक रेटने ५४३९ धावा केल्या आहेत.

धोनीने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत फक्त ५ सामने खेळलेला नाही. म्हणजेच धोनीने गेल्या १९ वर्षात २५३ पैकी फक्त ५ सामने खेळलेले नाहीत. २०१०च्या हंगामात धोनी तीन सामने खेळला नव्हता. दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स), किंग्स इलेव्हन पंजा (आताची पंजाब किंग्स) व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसला नव्हता. तर २०१९ मध्ये पाठीची दुखापत व २०२६ मध्ये तापामुळे धोनी एकेक सामना खेळला नव्हता.

धोनी न खेळलेले सामने

दिल्ली डेअरडेव्हिल्स (२०१०)
किंग्स इलेव्हन पंजाब (२०१०)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२०१०)
सनरायझर्स हैदराबाद (२०१९) पाठीची दुखापत
मुंबई इंडियन्स (२०२६) ताप

धोनी चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यामध्ये आयपीएल आणि सीएलटी२० सामन्यांचा समावेश आहे. सुरेश रैनाने २०० हून अधिक आयपीएल सामने खेळले असून यादरम्यान ५५२८ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. त्याने गुजरात लायन्सकडून खेळताना दोन हंगामात ८४१ धावा केल्या होत्या. धोनीने २०१६-१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडूनही दोन हंगाम खेळले, ज्यात तो केवळ ५७६ धावा करू शकला.