CSK Emotional Message for Dhoni: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरू होऊन १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा मार्चमध्ये या स्पर्धेचा १६वा हंगाम सुरू होणार आहे. यापूर्वी, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये १५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे सीएसकेने आपल्या कर्णधारासाठी एक भावनिक ट्विट केले आहे. यंदा माही आयपीएलचा शेवटचा हंगाम खेळणार असल्याची शक्यता आहे.

भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार एमएस धोनीला सीएसके फ्रँचायझीमध्ये थाला म्हणजेच बॉस असे नाव देण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडू म्हणून एमएस धोनीसाठी आयपीएल २०२३ हा शेवटचा हंगाम असेल. यानंतर तो आयपीएलमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. १५ वर्षांपासून सीएसके फ्रँचायझीसोबत असलेला धोनी अजूनही फ्रँचायझीमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू मानला जातो.

Which teams will qualify for playoffs
IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
71 Kg Weight Loss In Two Years By CEO Dhruv Agrawal Diet Plan Exercise Routine
७१ किलो वजन दोन वर्षांत कमी करताना प्रसिद्ध सीईओने पाळलं ‘हे’ डाएट; पुन्हा वजन वाढू नये याचं सिक्रेटही सांगितलं

सीएसकेचे धोनीसाठी भावनिक ट्विट –

सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले, “१५ वर्षांपूर्वीची घटना आहे! जेव्हा थालाने येलोच्या ( प्रेमाच्या पिवळ्या जर्सीमध्ये) रुपाने आमच्या जीवनात पाऊल ठेवले!” चेन्नई सुपर किंग्जच्या या पोस्टमध्ये अनेक फोटो आहेत, ज्यामध्ये एमएस धोनी भावूक झालेला दिसत आहे. काही २०२२ च्या हंगामातील आहेत, तर काही आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामातील आहेत.

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या –

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. अनुभवी यष्टिरक्षक २००८ पासून फ्रेंचायझीचे नेतृत्व करत आहे. तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. कारण त्याने रोहित शर्मानंतर आपल्या संघासाठी सर्वाधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र, धोनीने रोहितपेक्षा अधिक वेळा आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले आहे.

हेही वाचा – INDW vs IREW: डकवर्थ लुईस नियमाने भारताचा आयर्लंडवर पाच धावांनी शानदार विजय; टीम इंडियाचा उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश

गेल्या वर्षीच्या निराशाजनक मोसमापेक्षा यंदा चांगली कामगिरी करण्याचे चेन्नई सुपर किंग्जचे लक्ष्य असेल. चार वेळा आयपीएल विजेता संघ आयपीएल २०२२ मध्ये १४ पैकी फक्त चार सामने जिंकू शकला. एमएस धोनी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शेवटचा सामना खेळणार असल्याचे घोषणा केली आहे. त्यांनी ही घोषणा काही वर्षांपूर्वी केली होती.