प्रसिद्ध दिवंगत खेळाडू मॅराडोनावर महिलेचा बलात्काराचा गंभीर आरोप; म्हणाली, “त्याने माझं…”

अल्वारेझने केलेली ही तक्रार २००१ मध्ये मॅराडोनासोबत अर्जेंटिना येथे केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे, जेव्हा तो ४० वर्षांचा होता आणि ती १६ वर्षांची होती.

maradona-1
ब्युनोस आयर्स, अर्जेंटिना येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या शेवटी मॅव्हिस अल्वारेझने हवाना, क्युबा येथे दिएगो मॅराडोनासोबतचे तिचे फोटो दाखवले (स्रोत: एपी)

दोन दशकांपूर्वी दिवंगत सॉकर स्टार डिएगो मॅराडोनाशी नातेसंबंध असलेल्या क्यूबाच्या माविस अल्वारेझ या महिलेने सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की मॅराडोनाने ती किशोरवयात असताना तिच्यावर बलात्कार केला होता आणि तिचे बालपण हिरावून घेतले होते. आतापर्यंतच्या महान फुटबॉल स्टारपैकी एक मानल्या जाणार्‍या मॅराडोनाचे एक वर्षापूर्वी २५ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले.

अल्वारेझने केलेली ही तक्रार २००१ मध्ये मॅराडोनासोबत अर्जेंटिना येथे केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे, जेव्हा तो ४० वर्षांचा होता आणि ती १६ वर्षांची होती. अल्वारेझने सांगितले की, सहलीच्या काही काळापूर्वी ती प्रथम मॅराडोनाला भेटली, जेव्हा तो ड्रग व्यसनमुक्तीसाठी उपचार घेण्यासाठी क्युबामध्ये होता. ब्यूनस आयर्समधील एका पत्रकार परिषदेत, अल्वारेझने सांगितले की, मॅराडोनाने हवाना येथील क्लिनिकमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता, तर तिची आई पुढच्या खोलीत होती.

“तो माझे तोंड दाबून माझ्यावर बलात्कार करत होता. मला याबद्दल जास्त विचार करायचा नाही,” अल्वारेझ म्हणाली.“या प्रसंगामुळे माझं बालपण माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं. हे अवघड आहे”. मृत्यूपूर्वी मॅराडोनाचे वकील मॅटियास मोर्ला यांनी टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. अल्वारेझने यापूर्वी मीडिया मुलाखतींमध्ये या संबंधांबद्दल भाष्य केलं होतं, परंतु मॅराडोनाने फक्त एका प्रसंगी तिच्यावर जबरदस्ती केली होती असेही ते म्हणाले.

तिने सांगितले की क्यूबाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी मॅराडोनाच्या मैत्रीमुळे वयात मोठे अंतर असूनही तिच्या कुटुंबाने नातेसंबंध होऊ दिले. “माझ्या कुटुंबाने क्युबन सरकारचा सहभाग नसता तर ते कधीही स्वीकारले नसते,” ती म्हणाली. “त्यांना दुसर्‍या मार्गाने असे नाते स्वीकारण्यास भाग पाडले गेले जे त्यांच्यासाठी किंवा कोणासाठीही चांगले नाही.”
क्युबाच्या सरकारने टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही. अल्वारेझने सांगितले की तिने “सर्व महिलांना, तस्करीला बळी पडलेल्या, गुन्ह्यातील सर्व महिलांना मदत करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे,” ती म्हणाली. “मला जमेल त्या मार्गाने त्यांना मदत करणार आहे. ही माझी कल्पना आहे.” तिने सांगितले की तिच्यासाठी अर्जेंटिनामध्ये परत येणे कठीण होते, कारण तिथे मॅराडोना अनेकांसाठी नायक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cuban woman says maradona raped her as teenager vsk

ताज्या बातम्या