बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड सुरू आहे. अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी रविवारी (७ ऑगस्ट) टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. अचंता-श्रीजा जोडीने मलेशियाच्या चुंग जावेन आणि लीन कारेन यांचा ११-४, ९-११, ११-५, ११-६ असा पराभव केला.

शरथ कमलचे त्याच्या कारकिर्दीतील मिश्र दुहेरी प्रकारातील हे पहिला सुवर्णपदक ठरले आहे. तर, राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या २४ वर्षीय श्रीजाचे देखील हे पहिलेच पदक ठरले आहे.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Ranji Trophy Mumbai's Tushar Deshpande and Tanush break the 78 year old record by scoring centuries against Baroda
Ranji Trophy : मुंबईच्या तुषार-तनुषने मोडला ७८ वर्षांपूर्वीचा विक्रम, बडोद्याविरुद्ध खेळताना रचला इतिहास

शरथ कमलने यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि साथियान ज्ञानसेकरन सोबत पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे. त्यामुळे श्रीजासोबत मिळवलेले सुवर्ण पदक हे त्याचे एकून तिसरे पदक ठरले आहे.

हेही वाचा – IND W Vs AUS W Gold Medal Match in CWG 2022: भारतीय मुली रौप्य पदकाच्या मानकरी; हरमनप्रीतची अयशस्वी झुंज

त्यात्पूर्वी, श्रीजाला महिला एकेरीतील कांस्य पदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या यांगझी लिऊविरुद्ध ३-४ असा पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूने श्रीजाचा ११-३, ६-११, २-११, ११-७, १३-१५, ११-९, ६-११ अशा फरकाने पराभव केला. हा सामना दीड तासांपेक्षा जास्त काळ चालला.