CWG 2022 Ind Vs Aus Gold Medal Match Updates in Marathi: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पार पडला. या रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा अवघ्या नऊ धावांनी पराभव करून सुवर्ण पदक जिंकले. परिणामी भारतीय मुलींना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या भारताला सर्वबाद १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यापूर्वी, कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बेथ मूनीच्या अर्धशतकाच्या बळावर निर्धारित २० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आठ बाद १६१ धावा केल्या आहेत. एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर ही सुवर्ण पदकाची लढत आयोजित करण्यात आली होती. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.

Live Updates

Commonwealth Games 2022, Ind W Vs Aus W Gold Medal Match Live: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यातील सर्व अपडेट्स

20:37 (IST) 7 Aug 2022
पॉवरप्लेमध्ये भारताची कामगिरी चांगली

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या चार टी २० सामन्यांतील पॉवरप्लेमध्ये भारताची कामगिरी चांगली आहे. चार सामन्यांतील पॉवरप्लेमध्ये भारताने फक्त दोन गडी गमावलेले आहेत.