बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूनी चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने सुवर्णपदक पटकावले. तिच्यापाठोपाठ लक्ष्य सेननेदेखील धडाकेबाज खेळू करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. लक्ष्यने पुरुष एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलेशियाचा त्झे योंग एनजी आणि भारताचा लक्ष्य सेन यांच्यादरम्यान पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात लक्ष्यने एनजीचा २१-१९, २१-९, २१-१६ अशा फरकाने पराभव केला. मलेशियाचा खेळाडू जखमी झालेला असूनही त्याने लक्ष्यला कडवी झुंज दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे लक्ष्येचे पहिले सुवर्ण पदक ठरले आहे.

रविवारी (७ ऑगस्ट) झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात लक्ष्य सेनने जबरदस्त खेळ दाखवला होता. जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यने सिंगापूरच्या जिया हेंग तेह २१-१०, १८-२१, २१-१६ असा पराभव केला होता.

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या लक्ष्ये सेनने डिसेंबर २०२१ मध्ये जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर त्याने जानेवारीमध्ये ‘इंडिया ओपन सुपर ५००’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg 2022 indian badminton star lakshya sen won gold medal in men singles vkk
First published on: 08-08-2022 at 16:36 IST