चेन्नई : भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने एमचेस ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत जगज्जेत्या मॅगनस कार्लसनला पराभूत केले आणि कार्लसनला पराभूत करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

चेन्नईचा गुकेशने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना २९ चालींमध्ये विजय मिळवला. बारा फेऱ्यानंतर गुकेश पोलंडच्या यान-क्रिस्तोफ डूडा (२५ गुण) आणि अजरबैजानच्या शख्रियार मामेदेरोव्ह (२३ गुण) यानंतर तिसऱ्या स्थानी आहे. गुकेशचे २१ गुण आहे. यापूर्वी १९ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसीने कार्लसनला नमवले होते.एरिगेसीचे २१ गुण असून तो चौथ्या स्थानावर आहे.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

कार्लसनला पराभूत करणारा गुकेश सर्वात युवा खेळाडू आहे. गुकेशचे वय १६ वर्षे, चार महिने आणि २० दिवस आहे. गेला विक्रम आर. प्रज्ञानंदच्या नावे आहे. प्रज्ञानंदने एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला नमवले, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे, सहा महिने आणि १० दिवस होते.

 विदित गुजराती १०व्या स्थानावर असून तो बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आदित्य मित्तम १२व्या स्थानी आहे. त्याने १२व्या फेरीत एरिगेसीला पराभूत केले होते, मात्र तो गेल्या तीन सामन्यात पराभूत झाला. पी. हरिकृष्णा १५व्या स्थानावर आहे.‘‘कार्लसनला पराभूत करणे हे विशेष असते, मी ज्या पद्धतीने खेळलो त्याने मी समाधानी आहे.’’ असे गुकेश विजय मिळवल्यानंतर म्हणाला.

गुकेश आणि कार्लसनमधील सामना चुरशीचा झाला. गुकेश नेहमी निर्भीडपणे खेळतो. कार्लसनने एक चूक केली आणि गुकेशने या संधीचा फायदा घेतला. गुकेशविरुद्ध खेळताना मलाही हा अनुभव आला आहे. प्रतिस्पर्ध्याने चूक केल्यास गुकेश त्याला पुनरागमनाची संधी देत नाही. या लढतीतही गुकेशने आपले कौशल्य दाखवले.  

विश्वनाथन आनंद