वृत्तसंस्था, सिंगापूर
बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता ठरल्यानंतर रात्री झोप न लागल्याने दोम्माराजू गुकेशचे डोळे थोडे चुरचुरत होते. मात्र, या स्थितीतही त्याने कोणतीही तक्रार न करता शकडो चाहत्यांना स्वाक्षऱ्या दिल्या, छायाचित्रे काढली आणि अखेरीस भव्य समारोप सोहळ्यात जगज्जेतेपदाचा चषक उंचावला. माझ्या आयुष्यातील हा सर्वांत मोठा क्षण आहे. माझे स्वप्न पूर्ण झाले आहे, अशी भावना गुकेशने व्यक्त केली.

भारताच्या १८ वर्षीय गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करत १८वा बुद्धिबळ जगज्जेता बनण्याचा मान मिळवला. तसेच जगज्जेतेपद पटकावणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा केवळ दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला. गुरुवारी हे ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर शुक्रवारी त्याला जगज्जेतेपदाचा चषक देण्यात आला.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
australian open 2025 novak djokovic defeats indian origin teen sensation nishesh basavareddy
तारांकितांची अपेक्षित सुरुवात; जोकोविचची भारतीय वंशाच्या निशेषवर मात; सिन्नेर, अल्कराझचेही यश
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Success Story Of M Sivaguru Prabhakaran
Success Story Of M Sivaguru Prabhakaran : कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी सोडली नोकरी; ‘या’ संधीचे केले सोने अन् पूर्ण झाले ‘त्याचे’ आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न
Magnus Carlsen match fixing
विश्लेषण : जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदासाठी कार्लसनकडून ‘फिक्सिंग’? नक्की प्रकरण काय?
Success Story rakesh
Success Story : परिस्थितीने खचला नाही; मित्रांच्या मदतीने आर्थिक परिस्थितीवर मात करून उत्तीर्ण केली CA परीक्षा

हेही वाचा : कार्लसनकडून गुकेशचे कौतुक, जगज्जेतेपदासाठी लढण्यास मात्र नकार

त्याच्या दिवसाची सुरुवात या चषकाची एक झलक पाहूनच झाली. मात्र, त्यावेळी त्याने चषकास स्पर्श करण्यास नकार दिला. मी सायंकाळी होणाऱ्या समारोप सोहळ्याची वाट पाहत आहे, असे गुकेश म्हणाला. अखेर समारोप सोहळ्यात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच यांच्या हस्ते जगज्जेतेपदाचा चषक स्वीकारल्यानंतर गुकेशच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य थांबत नव्हते.

‘‘मी हा क्षण लाखो वेळा जगल्यासारखे वाटत आहे. प्रत्येक दिवशी मी हेच (जगज्जेतेपदाचे) ध्येय बाळगून उठायचो. माझे हे ध्येय, माझे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. जगज्जेतेपदाचा चषक उंचावणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण आहे. यापेक्षा मोठे काही असूच शकत नाही,’’ असे गुकेश म्हणाला. यावेळी त्याला १३ लाख अमेरिकन डॉलरचा धनादेशही देण्यात आला.

‘‘माझा इथवरचा प्रवास एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हता. मी अनेक चढ-उतार पाहिले. अनेक आव्हानांना सामोरा गेलो. मात्र, मी यापैकी एकही गोष्ट बदलू इच्छित नाही. प्रत्येक परिस्थितीने मला अधिक सक्षमच केले आहे. माझा हा प्रवास इतका सुंदर झाला, याचे श्रेय माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व व्यक्तींना जाते,’’ असेही गुकेशने नमूद केले.

हेही वाचा : Viswanathan Anand : टीकाकारांकडे दुर्लक्ष करणे गरजेचे, विश्वनाथन आनंदचा गुकेशला सल्ला

तसेच गुकेशने आपला प्रतिस्पर्धी डिंगबाबतही आदर व्यक्त केला. ‘‘डिंगला हरविणे अजिबातच सोपे नव्हते. त्याने लढा देणे शेवटपर्यंत सोडले नाही. अखेर मला विजयाचा मार्ग सापडला आणि मी यशस्वी झालो. मी खूप खुश आहे,’’ असे गुकेश म्हणाला.

समारोप सोहळ्यात ‘फिडे’चे अध्यक्ष द्वार्कोविच यांनी गुकेश आणि डिंगचे कौतुक करतानाच या लढतीच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा गुकेशशी संवाद

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुकेशला फोन करून त्याच्याशी संवाद साधला आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता ठरल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. ‘‘सिंगापूरमध्ये झालेली जागतिक अजिंक्यपद लढत जिंकल्याबद्दल आणि वयाच्या १८व्या वर्षीच जगज्जेतेपद पटकावल्याबद्दल गुकेशचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याची ही कामगिरी अद्भूत असून असंख्य तरुणांना यातून प्रेरणा मिळेल. गुकेशला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा. महाराष्ट्रात त्याचे स्वागत आणि सत्कार करण्यास उत्सुक आहे,’’ असे फडणवीस यांनी ‘एक्स’वर लिहिले.

हेही वाचा : बुद्धिबळातील सर्वोच्च शिखर सर, सर्वांत युवा जगज्जेत्या गुकेशची कास्पारोव्हकडून स्तुती

तमिळनाडू सरकारकडून पाच कोटींचे बक्षीस

जागतिक अजिंक्यपद लढतीतील ऐतिहासिक यशानंतर चेन्नईकर गुकेशला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याकडून रोख पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. ‘‘गुकेशच्या अलौकिक यशाचा सन्मान करण्यासाठी मी त्याला पाच कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करत आहे. त्याच्या यशाने देशाची मान उंचावली आहे. त्याने अशीच प्रगती करत राहावी यासाठी त्याला खूप शुभेच्छा,’’ असे स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर लिहिले.

Story img Loader