|| प्रशांत केणी

अंतिम फेरीत पाटणा पायरेट्सवर एका गुणाने निसटता विजय

Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

बंगळूरु :  प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात दबंग दिल्लीच्या रूपात ‘नवीन’ विजेते उदयास आले. विक्रमवीर चढाईपटू प्रदीप नरवालच्या अनुपस्थितीत चौथ्यांदा जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या पाटणा पायरेट्सला रोमहर्षक लढतीत दिल्लीने ३७-३६ असे नमवले.

बंगळूरुच्या शेरेटॉन हॉटेलच्या क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात बचावपटूंपेक्षा आक्रमकांचे वर्चस्व पाहायला मिळाले. दिल्लीच्या विजयाचे विजय मलिक (१४ गुण) आणि नवीन कुमार (१० गुण) हे शिल्पकार ठरले. दिल्लीकडून अनुभवी बचावपटू मनजीत चिल्लर आणि संदीप कुमार यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले.

सामन्याच्या सुरुवातीला नवीन आणि सचिन तन्वर यांच्यातील चढायांतील बोनस गुणासाठीची जुगलबंदी पाहायला मिळाली. सचिन (१० गुण) आणि गुमान सिंग (९ गुण) यांनी पाटण्याला पहिल्या सत्रात १७-१५ अशी आघाडी मिळवून दिली. पण पहिला लोण १५व्या मिनिटाला दिल्लीने पाटण्यावर चढवला. दुसऱ्या सत्रात ११व्या मिनिटाला दिल्लीने पाटण्याला २५-२५ असे बरोबरीत गाठले. मग १४व्या मिनिटाला दिल्लीने दुसरा लोण चढवला आणि आघाडी घेतली. १७व्या मिनिटाला विजयने चढाईत एक बोनससह तीन गुण वसूल करीत दिल्लीला मोठी आघाडी मिळवून दिली. पण अखेरच्या मिनिटांत पाटण्याने मोनू आणि मोहम्मदरझा शाडलू यांनी चढायांच्या गुणांवर कडवी लढत दिली. विजयने यशस्वी चढायांचे सातत्य राखत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पाटण्याचा बचावटू मोहम्मदरझाची जादू अंतिम सामन्यात पाहायला मिळाली नाही. उपांत्य सामन्यात प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाला हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मदरझाला फक्त दोन गुण मिळवता आले.

’ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू :  नवीन कुमार (दबंग दिल्ली)

’ सर्वोत्तम चढाईपटू : पवन शेरावत (बंगळूरु बुल्स)

’ सर्वोत्तम  पकडपटू : मोहम्मदरझा (पाटणा पायरेट्स)

’ सर्वोत्तम  नवोदित खेळाडू :

मोहित गोयल (पुणेरी पलटण)

नवीन आणि विजय यांनी अपेक्षेप्रमाणे चढायांतील वैयक्तिक खेळ उंचावला. याचप्रमाणे मनजीत, जिवा आणि संदीप या अनुभवी खेळाडूंचा बचाव संघासाठी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे गतवर्षी हुकलेले जेतेपद यंदा दिल्लीला जिंकता आले.

-कृष्णकुमार हुडा, दबंग दिल्लीचे प्रशिक्षक