दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन हा त्याच्या पिढीतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक होता आणि त्याने त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांसाठी समस्या निर्माण केल्या. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये उपयुक्त ट्रॅकवर गोलंदाजी असो, किंवा उपखंडातील स्पर्धा असो, स्टनने सर्वांनाच धडकी भरवणारी गोलंदाजी केली.

स्टेनने ९३ सामन्यांत ४३९ बळी घेऊन आपली कसोटी कारकीर्द पूर्ण केली आणि तो आपल्या देशासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. स्टेनकडून कसोटीत आणखी विकेट्स घेण्याची अपेक्षा होती, पण त्याच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध अनेक दुखापतींनी ग्रासला होता, ज्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावे लागले.

स्टेनने १२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९६ विकेट्स आणि ४७ टी-२० मध्ये ६४ विकेट्स घेतल्या आहेत. क्रिकेटमधून फारकत घेतल्यानंतर स्टेन आता क्रिकेटपंडिताच्या भूमिकेत पाहायला मिळतो. तो ट्विटरवरही मते देतो. अशातच स्टेनने एका सत्रात आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. चाहत्यांनीही स्टेनला अनेक प्रश्न विचारले. यादरम्यान एकाने त्याला एक मनोरंजक प्रश्न विचारला. “आजच्या पिढीमध्ये कोणत्या फलंदाजाने तुझ्यासाठी समस्या निर्माण केल्या असत्या असे तुला वाटते?”, असा प्रश्न एका चाहत्याने विचारला.

हेही वाचा – कॅप्टन हिटमॅन..! विराटच्या ‘त्या’ निर्णयामुळं रोहित करणार कसोटी संघाचंही नेतृत्व

या प्रश्नाला स्टेनने “केएल” अशा दोन अक्षरात उत्तर दिले. स्टेनला असे वाटते, की भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुल त्याच्यासाठी समस्या निर्माण करणारा फलंदाज ठरला असता. राहुल गेल्या काही वर्षांपासून भारतीय टी-२० आणि वनडे संघाचा अविभाज्य भाग आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर राहुल २०१९चा वनडेचा विश्वचषक खेळला आणि तो भारताच्या अलीकडील टी-२० विश्वचषक मोहिमेचा एक भाग होता. राहुलकडे भविष्यातील महान क्रिकेटपटू म्हणून पाहिले जात आहे.