वृत्तसंस्था, इंडियन वेल्स
माजी ग्रँडस्लॅम विजेत्या डॅनिल मेदवेदेवने अग्रमानांकित कार्लोस अल्काराझला पराभवाचा धक्का देत इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अल्कराझचा हा वर्षातील पहिला पराभव ठरला.
अमेरिकेत सुरू असलेल्या स्पर्धेत मेदवेदेवने अल्कराझवर ६-३, ७-६ (७-३) असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. आता विजेतेपदासाठी ११व्या मानांकित मेदवेदेवची इटलीच्या दुसर्या मानांकित यानिक सिन्नेरशी गाठ पडेल. सिन्नेरने अलेक्झांडर झ्वेरेव्हचे आव्हान ६-२, ६-४ असे सहज संपुष्टात आणले.
अल्काराझने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि कतार स्पर्धेतील जेतेपदासह या वर्षी सलग १६ सामने जिंकले होते. मात्र, मेदवेदेवने त्याचा पराभव करून अल्काराझ-सिन्नेर -संभाव्य अंतिम लढतीची शक्यता संपुष्टात आणली.
