भारत दौऱयासाठी वेस्ट इंडिजचे नेतृत्व ‘डॅरेन सॅमी’कडे

येत्या नोव्हेंबरमध्ये भारत दौऱयावर येणाऱया वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीकेड देण्यात आले आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान

येत्या नोव्हेंबरमध्ये भारत दौऱयावर येणाऱया वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीकेड देण्यात आले आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान, 6 व 14 नोव्हेंबर असे दोन कसोटी सामने. तसेच नोव्हेंबरमध्येच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे.
या मालिकेसाठीचा वेस्ट इंडिजचा पंधरा सदस्यीय संघही जाहीर करण्यात आला आहे. या कॅरेबियन संघाचे नेतृत्व डॅरेन सॅमी करणार आहे. सामन्यांची तारिख निश्चित करण्यात आली असून अद्याप सामन्यांची ठिकाणे निश्चित झालेली नाहीत.
कसोटी सामने-
पहिला कसोटी सामना- 6 नोव्हेंबर
दुसरा कसोटी सामना- 14 नोव्हेंबर
एकदिवसीय सामने-
पहिला एकदिवसीय सामना- 21 नोव्हेंबर
दुसरा एकदिवसीय सामना- 24 नोव्हेंबर
तिसरा एकदिवसीय सामना- 27 नोव्हेंबर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Darren sammy to lead west indies in india tour

ताज्या बातम्या