David Warner Arrested in Australia: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरला पोलिसांना अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे आता डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मैदानावर आपल्या स्फोटक फलंदाजीने आणि विविध कारणांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्याच सापडणारा वॉर्नर आता मैदानाबाहेरील एका मोठ्या चुकीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तान सुपर लीगदरम्यान वॉर्नरवर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सध्या पाकिस्तानच्या पीएसएल (PSL) या टी-२० लीगमध्ये खेळत असलेल्या वॉर्नरला पोलिसांनी अटक केली. मद्यपान करून गाडी चालवल्याबद्दल वॉर्नरला अटक करण्यात आली असून, त्यामुळे पीएसएलमधील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अनुभवी डावखुरा फलंदाज वॉर्नर यावर्षी आयपीएलचा भाग नाहीये. त्यामुळे, त्याने पीएसएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला, जिथे तो कराची किंग्सचा कर्णधार आहे.

हंगामातील पहिल्या तीन सामन्यांनंतर, वॉर्नर ३ एप्रिल रोजी एका छोट्या ब्रेकसाठी अचानक आपल्या मायदेशी ऑस्ट्रेलियाला परतला. हा छोटा ब्रेक त्याच्यासाठी एका नवीन संकट ठरला, मद्यपान करून गाडी चालवत असताना त्याला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी का अटक केली?

ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्तानुसार, ५ एप्रिलला संध्याकाळी, सिडनीमधील एका वाहन तपासणी नाक्यावर, वॉर्नरने पोलिसांच्या तपासणी नाक्याच्या अगदी आधी अचानक आपली गाडी थांबवली. यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या स्टार क्रिकेटपटूची तपासणी केली. त्याची ब्रेथ टेस्ट (श्वासाची) घेण्यात आली, ज्यामध्ये तो मद्यधुंद असल्याचे दिसून आलं. परिणामी, अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. पोलीस ठाण्यात त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली, ज्यात त्याच्या श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट असल्याचं आढळलं. परिणामी, पोलिसांनी त्याला मे महिन्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

वॉर्नर पीएसएलमध्ये कधी परतणार, असा प्रश्न या प्रकरणानंतर आता निर्माण झाला आहे. कराची किंग्सचा पुढचा सामना ९ एप्रिल रोजी आहे. वॉर्नरला अटक केल्यानंतर लगेचच पोलिसांनी सोडून दिलं असलं तरी त्याला न्यायलयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे त्याच्या पीएसएलमध्ये खेळण्यासाठी पुन्हा जाऊ शकतो अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये येत आहेय परंतु तो पुढच्या सामन्यात खेळू शकेल की नाही हे सध्या अस्पष्ट आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली कराची किंग्सने तिन्ही सामने जिंकून हंगामाची दमदार सुरुवात केली होती.