भारतात १२ जूनला अहमदाबादमध्ये लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली. टेकऑफनंतर विमानाचा अवघ्या काहीच वेळात अपघात झाला आणि संपूर्ण जगभरात याबाबत शोक व्यक्त केला जात आहे. या अपघाताबाबत अनेक खेळाडू आणि क्रिकेटपटूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने देखील एअर इंडिया विमानाच्या अपघाताबाबत शोक व्यक्त करत पुन्हा कधीही या विमानाने प्रवास करणार नसल्याचं थेट म्हटलं आहे. डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत केली आहे. यामध्ये त्याने एअर इंडियाबाबत घडलेला एक प्रसंगही सांगितला. डेव्हिड वॉर्नरने स्वतः त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या माजी डावखुऱ्या सलामीवीराने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अहमदाबाद विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वप्रथम, त्याने संपूर्ण घटनेला दुःखद म्हटले. याचबरोबर त्याने एअर इंडियाला टॅगही केलं आहे. मी आता कधीच एअर इंडियामधून प्रवास करणार नसल्याचे तो म्हणाला.

डेव्हिड वॉर्नरच्या या विधानामागील कारण म्हणजे एअर इंडियाच्या एका माजी क्रू मेंबरने केलेला आरोप. ज्यामध्ये त्याने खराब विमानांचा वारंवार वापर केल्याचा उल्लेख केला होता. वॉर्नरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या माजी एअर इंडियाच्या एका स्टाफने सर्वांनी या विमानाबाबत तक्रार केल्याची माहिती दिल्याचे सांगितले आहे. पण कंपनीने त्याबाबत काहीच अॅक्शन न घेतल्याचे म्हटलं आहे. वॉर्नर पोस्टमध्ये म्हणाला, “हे जर खरं असेल तर फारच धक्कादायक आहे. ज्या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावलेत, त्यांच्यासाठी वाईट वाटतंय. मी आता यापुढे कधीच एअर इंडियामधून प्रवास करणार नाही.”

वॉर्नरने आणखी एक स्टोरी पोस्ट केली ज्यामध्ये त्याने आणखी एक बोईंग विमान कोसळल्याची माहिती दिली. अशा प्रकारे निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळून नफा कम मिळवणं अत्यंत लज्जास्पद आहे, असं त्याने म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
David Warner Instagram Story
एअर इंडिया विमान अपघातावर डेव्हिड वॉर्नरची इन्स्टाग्राम स्टोरी

भारत आणि भारत अ संघाच्या इंट्रा स्क्वाड सामन्यातही खेळाडूंनी अहमदाबादमधील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना आदरांजली वाहिली आणि हातावर काळी पट्टी बांधून खेळत आहेत. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यातही खेळाडूंनी एअर इंडिया विमान अपघातातील लोकांना आदरांजली वाहिली. याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही हातावर काळी पट्टी बांधून खेळत आहेत.