scorecardresearch

IND vs AUS 3rd ODI: चेन्नईमध्ये डेव्हिड वार्नरने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ११वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला

IND v sAUS 3rd ODI Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा वनडे खेळला गेला. या सामन्यात डेव्हिड वार्नर एक पराक्रम केला आहे. त्याने वनडेत भारताविरुद्ध १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

IND vs AUS 3rd ODI match Updates
डेव्हिड वार्नर (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

IND vs AUS 3rd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी केली. त्याचबरोबर भारतीय संघापुढे २७० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आज जरी डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी मोठी खेळी खेळू शकला नसला, तरी त्याने आपल्या २३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाविरुद्ध एक नवा विक्रम केला आहे.

डेव्हिड वॉर्नरने टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या आहेत. भारताविरुद्धच्या या सामन्यापूर्वी वॉर्नरने ९९० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन डावाच्या १८व्या षटकात त्याने रवींद्र जडेजाच्याविरुद्ध एक धाव घेत १००० धावा पूर्ण केल्या आणि हा विक्रम आपल्या नावावर केला.

भारताविरुद्ध ९६.५ च्या स्ट्राईक रेटने १००० धावा पूर्ण केल्या –

डेव्हिड वॉर्नने भारताविरुद्ध केवळ २१ डावांमध्ये ५२.९च्या सरासरीने ९६.५ च्या स्ट्राईक रेटने नाबाद १०१३ धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोनुसार, १००० हून अधिक धावा करणारा तो भारताविरुद्ध ही कामगिरी करणारा ११वा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. या सामन्यात वॉर्नरला २५व्या षटकात डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवकने झेलबाद केले.

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने चांगली सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६१ धावांची भर घातली. मात्र, हेड ३३ धावा करून बाद झाला. मिचेल मार्शने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. त्याचबरोबर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: मोहम्मद सिराजने झेल सोडताच संतापला जडेजा; तर गावसकरांच्या कॉमेंट्रीने जिंकले मन, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन – डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

भारताची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 21:49 IST

संबंधित बातम्या