राशिद खानच्या ‘बाहुबली’ लूकवर वॉर्नरची मजेशीर कमेंट

पाहा वॉर्नरने काय दिला रिप्लाय

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. या मालिकेत वॉर्नरला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण सोशल मीडियावर सक्रीय असण्यात आणि शाब्दिक फटकेबाजी करण्यात वॉर्नर कायमच सरस असल्याचं दिसून आलं आहे. IPLमधील वॉर्नरच्या हैदराबाद संघाचा सहकारी राशिद खान याने नुकताच स्वत:चा बाहुबली लूक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यावर वॉर्नरने भन्नाट कमेंट केली.

पुन्हा विराट कर्णधार अन् तू उपकर्णधार!; पत्रकाराच्या प्रश्नावर अजिंक्य रहाणेनं दिलं ‘हे’ उत्तर

डेव्हिड वॉर्नरने लॉकडाउन काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले. बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांच्या गाण्यांवरील त्याचे डान्स लोकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यानंतर त्याने काही गाजलेल्या भूमिकांच्या हिरोच्या जागी स्वत:चा चेहरा लावून व्हिडीओ पोस्ट केले होते. तशाच प्रकारचा एक व्हिडीओ आता राशिद खानने पोस्ट केला आहे. बाहुबली चित्रपटातील काही क्षण एकत्र करत राशिदने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने अभिनेता प्रभासच्या जागी स्वत:चा चेहरा वापरून व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

राशिदने हा व्हिडीओ पोस्ट करून कॅप्शनमध्ये चाहत्यांना प्रश्न विचारला आहे की हा चित्रपट आणि अभिनेता कोण ते ओळखा. वॉर्नरने जेव्हा बाहुबली लूक वाला असाच एक व्हिडीओ पोस्ट केला होता तेव्हा त्यानेदेखील अशाच पद्धतीचं कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे वॉर्नरने या व्हिडीओवर कमेंट करताना, ‘राशिद, तू माझी ओळख चोरलीस’, अशी मजेशीर कमेंट केली.

दरम्यान, IPL 2021 साठी हैदराबाद संघाने कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फिरकीपटू राशिद खान दोघांनाही संघात कायम ठेवलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: David warner reacts after srh teammate rashid khan turns into baahubali in hilarious video see post vjb

ताज्या बातम्या