डेव्हिड वॉर्नरने प्रदीर्घ काळानंतर आपल्या शतकाचा दुष्काळ संपवला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०६ धावांची शतकी खेळी खेळली. त्याने १०४३ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावले आहे. कांगारू संघाने याआधीच ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉर्नरने १०२ चेंडूत १०६ धावा केल्या. ज्यामध्ये ८ चौकार आणि २ षटकार लगावले. दुसरा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडनेही १३० चेंडूत १५२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याने १६ चौकार आणि ४ षटकार लगावले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २६९ धावांची मोठी भागीदारी केली.आता वॉर्नरच्या वनडेमध्ये ६००० धावाही पूर्ण झाल्या आहेत. त्याने आतापर्यंत १४१ सामन्यांच्या १३९ डावांमध्ये ४५ च्या सरासरीने ६००० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १९ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहेत. म्हणजेच त्याने ४६ वेळा ५० पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. स्ट्राइक रेट ९५ आहे.

ऑस्ट्रेलियासाठी वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत वॉर्नर नंबर-२ वर पोहोचला आहे. त्याने माजी दिग्गज मार्क वॉला मागे सोडले आहे. वॉने २४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८ शतके झळकावली आहेत. दुसरीकडे, वॉर्नरच्या नावावर १९ शतके आहेत. तो आता फक्त माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या मागे आहे.रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाकडून ३७४ वनडे सामन्यांमध्ये १३५८९ धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक २९ शतके केली आहेत. याशिवाय अॅरॉन फिंचने १७, अॅडम गिलख्रिस्टने १६, स्टीव्ह स्मिथने १२ आणि मॅथ्यू हेडनने १० शतके झळकावली आहेत. इतर कोणत्याही कांगारू फलंदाजाला 10 शतके पूर्ण करता आली नाहीत.

३६ वर्षीय डेव्हिड वॉर्नरचा कसोटीतील विक्रमही उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत ९६ सामन्यांच्या १७६ डावांमध्ये ४७ च्या सरासरीने ७६१७ धावा केल्या आहेत. त्याने २४ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली आहेत. ज्यामध्ये नाबाद ३३५ धावांची सर्वोत्तम खेळी खेळीच समावेश आहे. त्याचबरोबर ९९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २८९४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि २४ अर्धशतकं केली आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटसह सर्वाधिक शतकांच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ३३६ सामन्यांमध्ये ४४ शतके झळकावली आहेत. दुसरीकडे, रिकी पाँटिंगने ५५९ सामन्यांमध्ये सर्वाधिक ७० शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – डेव्हिड वॉर्नरने नेतृत्वाच्या बंदीवर सोडले मौन; म्हणाला, ‘मी गुन्हेगार…..!’

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मालिकेबद्दल बोलायचे, तर कांगारू संघ तिसरा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करू इच्छितो. त्याने पहिला सामना ६ विकेटने तर दुसऱ्या वनडेत ७२ धावांनी जिंकला. इंग्लंडने याआधी दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले, पण ऑस्ट्रेलियात संघाला आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner scored an international hundred after 1043 days for australia against england vbm
First published on: 22-11-2022 at 14:36 IST