आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदाची दारे खुली झाली आहेत. मात्र अद्याप त्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आलेली नाही. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदावरील बंदी हटवून तो पुन्हा कर्णधार म्हणून दिसू शकतो. आता यावर डेव्हिड वॉर्नरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या आचारसंहितेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये यासंदर्भात एक बैठक झाली होती. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, या बैठकीत जे काही निर्णय घेण्यात आले ते लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता डेव्हिड वॉर्नर त्याच्या बंदीच्या विरोधात अपील करू शकणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर वॉर्नरवर २०१८ मध्ये आजीवन नेतृत्व बंदी घालण्यात आली होती.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

डेव्हिड वॉर्नर सोमवारी एका कार्यक्रमात म्हणाला की, तो गुन्हेगार नाही आणि त्याला काही टप्प्यावर अपील करण्याचा अधिकार असावा. वॉर्नर म्हणाला की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आपल्या आचारसंहितेमध्ये सुधारणा करण्यास इतका वेळ लागला हे पाहून निराशा झाली, तो पुढे म्हणाला,’हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आणि सर्व सहभागींसाठी वेदनादायक आहे.’

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज सलामीवीराने सांगितले की, हे निराशाजनक आहे. कारण ही प्रक्रिया नऊ महिन्यांपूर्वी पूर्ण केली जाऊ शकली असती. जेव्हा ती पहिल्यांदा आणली गेली होती, बोर्डाने त्याच्यावर बंदी घालण्यासाठी फक्त चार दिवस घेतले होते.

हेही वाचा – विराट आणि बाबरमध्ये कोणाचा कव्हर ड्राईव्ह चांगला? केन विल्यमसनने दिले उत्तर

या मुद्द्यावर बोलताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, ”मी गुन्हेगार नाही. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अपील करण्याचा अधिकार मिळायला हवा. मला समजले की त्यांनी बंदी घातली आहे परंतु एखाद्यावर आजीवन बंदी घालणे, मला वाटते ते थोडे कठोर आहे.”

वॉर्नर आता त्याच्यावर चार वर्षांपूर्वी लादण्यात आलेल्या बंदीच्या पुनरावलोकनासाठी औपचारिकपणे अर्ज करू शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी उठवल्यास वॉर्नरला २०२३ आणि २०२४ मधील आगामी विश्वचषकांसाठी ऑस्ट्रेलियन पांढऱ्या चेंडू संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आयपीएलमध्ये सनरायझर्सचे कर्णधार असताना तो संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला होता.