Candice Warner Allegations Against Cricket Australia: २०१८ मध्ये केपटाऊनमध्ये झालेल्या बॉल टॅम्परिंगच्या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) ऑस्ट्रेलियन सलामीवीर स्टीव्ह स्मिथवर एका वर्षासाठी कोणत्याही प्रकारच्या खेळात भाग घेण्यास बंदी घातली होती. तसेच डेव्हिड वॉर्नरवर ऑस्ट्रेलियात नेतृत्व करण्यावर कायमची बंदी घातली. कँडिस वॉर्नरने क्रिकेटवर आरोप केला आहे की, सँडपेपर-गेट प्रकरणानंतर तिचा पती डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आता तुम्ही स्वतःचा बचाव स्वत: करा –

मात्र, स्टीव्ह स्मिथवर केवळ दोन वर्षांसाठी कर्णधारपदावर बंदी घालण्यात आली होती आणि आता तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. त्याच वेळी, सँडपेपर-गेट प्रकरणात सामील असलेला तिसरा क्रिकेटपटू कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला नऊ महिन्यांसाठी खेळातून बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिसने खुलासा केला आहे की, जेव्हा सलामीवीर दक्षिण आफ्रिकेतील हॉटेलमधून बाहेर पडला तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) त्याला अजिबात साथ दिली नाही, त्याला एकटे सोडले.

IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
Mohammad Nabi's Son Video Viral
IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल
British Prime Minister Rishi Sunak batting in the net session with England players
Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा केला सामना, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

कँडिस वॉर्नर मॅटी जॉन्स पॉडकास्टवर म्हणाली, “आम्हाला कोणाचाही पाठिंबा नव्हता आणि आधारही नव्हता. आम्ही दक्षिण आफ्रिकेतील टीम हॉटेल सोडल्यापासून डेव्हिड एकटा पडला होता. त्याला मदत करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणीही अधिकारी नव्हता. तिथेही त्याला आधार मिळाला नाही.”

हेही वाचा – IPL 2023 RCB vs RR: वडील बाद होताच आर अश्विनची मुलगी झाली भावूक, रडतानाचा VIDEO व्हायरल

कँडिस वॉर्नर पुढे म्हणाली, “त्यावेळी असे होते की, ‘आता तुम्ही स्वतःचा बचाव करा, नंतर भेटू’. तुमच्या सेवेबद्दल धन्यवाद, तुम्ही परत कधीही आमच्या देशासाठी क्रिकेट खेळू नये यासाठी आम्ही तुमच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सूचित करणारी परिस्थिती होती. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला दोष देणार आहोत. आणि त्याने तेच केले.”

आयपीएलच्या १६ व्या हंगामात डेव्हिड वार्नर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे –

आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा डेव्हिड वार्नरच्या खांद्यावर आहे. या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. या संघाने सुरुवातीचे सलग पाच सामने गमावले. त्यानंतर सहाव्या सामन्यात संघाने विजय मिळवून आपल्या गुणाचे खाते उघडले. दिल्ली कॅपिटल्सची आयपीएलमध्ये सोमवारी (२४ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादशी लढत होईल, त्यानंतर विजयाची मालिका सुरू ठेवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. या मोसमात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी चांगली नसून प्रत्येक विभागात त्यांची निराशा झाली आहे. याच कारणामुळे त्यांना पहिल्या पाच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.