WPL 2026 DC vs UPW Match Highlights in Marathi: दिल्ली कॅपिटल्स संघाने अखेरच्या चेंडूवर युपी वॉरियर्ज संघावर ७ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. कर्णधार जेमिमा रॉड्रीग्जच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. दिल्ली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी युपी वॉरियर्जने मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज दिली. पण अखेरीस दिल्लीने विजय मिळवला.

गुजरात जायंट्सविरूद्ध आधीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ अखेरच्या षटकात ६ धावा करण्यात अपयशी ठरला होता. यावेळेस युपी वॉरियर्जविरूद्ध देखील सारखंच चित्र होतं. दिल्लीला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ चेंडूत ६ धावांची गरज होती. फिरकीपटू सोफी एकलस्टन गोलंदाजी करत होती, पहिला चेंडी डॉट बॉल राहिला, त्यानंतर मारिजन कापने दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचला. तिसरा, चौथा दोन्ही चेंडू डॉट बॉल राहिले. पाचव्या चेंडूवर मारिजन कापने एक धाव घेतली आणि अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना लॉरा वोल्व्हार्डने चौकार लगावत संघाला अखेरीस पहिला विजय मिळवून दिला.

युपी वॉरियर्जने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात दणक्यात झाली. दिल्लीकडून शफाली वर्मा व लिझेल ली यांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. शफाली वर्मा ३२ चेंडूत ६ चौकारांसह ३६ धावा करत बाद झाली. तर लिझेल ली ४४ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह ६७ धावा करत बाद झाली. त्यानंतर लॉरा वोल्व्हार्ड व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी संघाचा डाव पुढे नेला. पण जेमिमाने पुन्हा एकदा गुजरात जायंट्सविरूद्ध सामन्यातील विकेटप्रमाणे आपली विकेट गमावली. दिल्लीला विजयासाठी अखेरच्या षटकात पुन्हा एकदा ६ धावांची गरज होती.

अखेरच्या षटकात लॉरा वोल्व्हार्ड स्ट्राईकवर होती. पण लॉराने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. पण सोफी एकलस्टनने विजयासाठी दिल्लीला अखेरच्या चेंडूपर्यंत वाट पाहायला लावली. पण लॉराने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत युपी वॉरियर्ज संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. युपीची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. किरण नवगिरे पहिल्याच षटकात मारिजन कापने बाद केलं. यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने ३८ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ५४ धावा केल्या. तर फिबी लिचफिल्ड २७ धावा करत बाद झाली. यानंतर हरलीन देओलने ३६ चेंडूत ७ चौकारांसह ४७ धावांची खेळी करत रिटायर्ड आऊट झाली. यानंतर सर्व फलंदाज झटपट बाद झाल्याने युपीचा संघ २० षटकांत ८ बाद १५४ धावा करण्यात यशस्वी ठरला.