Delhi Capitals vs Mumbai Indians, IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने पराभव करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला. दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला समीर रिझवी. ज्याने ९० धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला आणि विजयही मिळवून दिला. या विजयासह दिल्लीचा संघ आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

Live Updates

IPL 2026 Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२६ सामन्याचे हायलाईट्स

19:15 (IST) 4 Apr 2026

समीर रिझवी एकटाच मुंबई इंडियन्सला भारी पडला! दिल्लीचा MIवर शानदार विजय; अक्षर पटेलचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी

DC vs MI Highlights: समीर रिझवीच्या खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला. ...सविस्तर बातमी
18:54 (IST) 4 Apr 2026
DC vs MI Live: मुंबईच्या खात्यात मोठी विकेट

समीर रिझवी ९० धावांवर बाद झाल्याने त्याचं पहिलं आयपीएल शतक हुकलं आहे. कार्बिन बॉशने १७व्या षटकात रिझवीला झेलबाद केलं.

18:41 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: दिल्ली कॅपिटल्स विजयाच्या उंबरठ्यावर

समीर रिझवीने अर्धशतकानंतर जोरदार फटकेबाजी सुरू केली आहे. त्याच्या या खेळीच्या बळावर दिल्ली विजयाच्या अधिक जवळ पोहोचली आहे. मुंबईचे सर्व गोलंदाज समीरला थांबवण्यात अपयशी ठरत आहे.

18:27 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: समीर रिझवी अर्धशतक

समीर रिझवीने २२ चेंडूत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत वादळी अर्धशतक झळकावलं आहे. यासह दिल्लीचा डाव सावरत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. दिल्लीला आता विजयासाठी ४८ चेंडूत ५६ धावांची गरज आहे.

18:19 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: मुंबईच्या खात्यात महत्त्वाची विकेट

मिचेल सँटनरने समीर रिझवी व पथुम निसांका यांची ६६ धावांची भागीदारी तोडत मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली आहे. पथुम निसांकाला ४४ धावांवर झेलबाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. यासह दिल्लीला विजयासाठी ६१ चेंडूत ९० धावांची गरज आहे.

18:05 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: पॉवरप्ले

समीर रिझवी व पथुम निसांका यांनी दोन विकेट्सनंतर दिल्लीचा डाव सावरला आहे. यासह पॉवरप्लेमध्ये संघाने २ बाद ४२ धावा केल्या आहेत.

17:57 (IST) 4 Apr 2026

MI vs DC: चतुर रोहित शर्मा! हिटमॅनच्या जाळ्यात फसले राहुल-कुलदीप; बाद नसतानाही बाहेर जाण्याचं नाटक केलं अन्..., पाहा VIDEO

Rohit Sharma Video: रोहित शर्माने आपल्या चालाखीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक रिव्ह्यू वाया घालावला. मैदानावर नेमकं काय घडलं, पाहूया. ...अधिक वाचा
17:41 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: मुंबईच्या खात्यात दुसरी विकेट

जसप्रीत बुमराह दुसरं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या चौथ्या चेंडूवर नितीश राणा हलक्या हाताने खेळला. बुमराह रनअपनंतर लगेच धावत जाऊन तो चेंडू उचलला आणि बॉलिंग एन्डच्या दिशेने मारत नितीशला रनआऊट केलं.

17:35 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: मुंबईची विकेटने सुरूवात

मुंबई-दिल्ली सामन्याला सुरूवात झाली असून मुंबईकडून दीपक चहर गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर केएल राहुलच्या बॅटची कड घेत चेंडू विकेटकीपरच्या हातात गेला आणि मुंबईला पहिली विकेट मिळाली.

17:16 (IST) 4 Apr 2026
DC vs MI Live: मुंबईने विजयासाठी दिल्लीला किती धावांचं आव्हान दिलं?

कार्बिन बॉशने मुकेश कुमारच्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार लगावत मुंबईला १६० धावांच्या पलीकडे नेलं आहे. दिल्लीच्या गोलंदाजीसमोर मुंबईला धावांचा हा आकडा गाठताना फार नाकीनऊ आले. वेगवान गोलंदाज असो व फिरकीपटू सर्वांनीच उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि मुंबईला मोठी धावसंख्या करू दिली नाही. यासह आता मुंबई इंडियन्सने दिल्लीला विजयासाठी १६३ धावांच आव्हान दिलं आहे.

रोहित शर्माच्या ३५ धावा, सूर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि नमन धीर-मिचेल सँटनर व कार्बिन बॉश यांच्या योगदानाच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६२ धावा केल्या आहेत.

17:05 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: नमन धीरच्या रूपात मुंबईला सहावा धक्का

१९व्या षटकात नटराजनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह मुंबईने आतापर्यंत ६ बाद धावा १४६ केल्या आहेत.

17:03 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: मुंबईच्या धावांना ब्रेक

नमन धीर व मिचेल सँटनरची जोडी मैदानावर असून दिल्ली कॅपिटल्सच्या सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिलेली नाही.

16:45 (IST) 4 Apr 2026
DC vs MI Live: सूर्यकुमार यादवचं अर्धशतक

सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचा डाव सावरत अर्धशतक झळकावलं आहे. स्लो खेळपट्टीवर खेळताना सूर्याने सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. सूर्याने ३५ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा केल्या आहेत. अर्धशतक केल्यानंतर सूर्या एनगिडीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आहे. यासह मुंबईने आतापर्यंत ५ बाद १२२ धावा केल्या आहेत.

16:32 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: मुंबईला चौथा धक्का

१२व्या षटकात विपराज निगमच्या गोलंदाजीवर शेरफन रूदरफोर्ड मोठा फटका खेळायला आणि चेंडू हवेत उंच उडाला. मुकेश कुमारने चेंडूवर नजर ठेवत सीमारेषेजवळ उत्कृष्ट चेंडू टिपला आणि मुंबईला चौथा धक्का बसला. यासह मुंबईने १२ षटकांत ४ बाद ८६ धावा केल्या आहेत.

16:18 (IST) 4 Apr 2026

DC vs MI Live: मुंबईला तिसरा धक्का

१०व्या षटकात अक्षर पटेलने दिल्लीला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली आहे. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा झेलबाद झाला. हिटमॅन २६ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३५ धावा करत माघारी परतला. यासह सूर्या रोहितची ५३ धावांची भागीदारी मोडली आहे.

16:13 (IST) 4 Apr 2026

Rohit Surya Partnership: रोहित-सूर्याची भागीदारी

भारताने झटपट दोन विकेट्स गमावल्यानंतर रोहित शर्मा व सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरला. यासह दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली आहे. यासह मुंबईने ९ षटकांत २ बाद ६९ धावा केल्या आहेत.

16:06 (IST) 4 Apr 2026

MI vs DC live: पॉवरप्ले

मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये २ विकेट्स गमावत ४१ धावा केल्या आहेत. रोहित २० धावा तर सूर्या ११ धावांवर खेळत आहेत. पॉवरप्लेमध्ये अक्षर पटेल व विपराज निगम या गोलंदाजांनी गोलंदाजी केल्यामुळे धावा करण्याची फारशी संधी मुंबईला मिळाली नाही.

15:44 (IST) 4 Apr 2026
MI vs DC live: मुंबईला एका षटकात दोन धक्के

तिसऱ्या षटकातील मुकेश कुमारच्या तिसऱ्या चेंडूवर रायन रिकल्टन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. यासह मुंबईला १८ धावांवर पहिला धक्का बसला आहे. रिकल्टन बाद झाल्यानंतर तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि दुसराच चेंडू खेळताना मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. यासह मुंबईने ३ षटकांत २ बाद २२ धावा केल्या आहेत.

15:39 (IST) 4 Apr 2026

याला म्हणतात संस्कार! वैभव सूर्यवंशी आशिष नेहराला भेटताच खाली वाकून पाया पडला; 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, VIDEO व्हायरल

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यापूर्वीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
15:39 (IST) 4 Apr 2026

MI vs DC Live: रिकल्टन-रोहितची चौकारांची फटकेबाजी

रायन रिकल्टनने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत शानदार सुरूवात केली. यानंतर पहिल्याच षटकात रिकल्टनने दोन चौकार लगावत ८ धावा कुटल्या. तर रोहित शर्मानेही लुंगी एनगिडीच्या पहिल्याच चेंडूवर चौकाराने सुरूवात केली आणि तिसऱ्या चेंडूवरही चौकार खेचला.

15:30 (IST) 4 Apr 2026

MI vs DC Live: सामन्याला सुरूवात

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांची जोडी मैदानात उतरली आहे. तर दिल्लीकडून मुकेश कुमार गोलंदाजीला सुरूवात करत आहे.

15:13 (IST) 4 Apr 2026
Delhi Capitals Playing XI: दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग इलेव्हन

केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार

15:08 (IST) 4 Apr 2026
Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यासाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पंड्याच्या जागी दीपक चहर, ट्रेंट बोल्टच्या जागी कार्बिन बॉश खेळणार आहे. तर अल्लाह गझनफरच्या जागी मिचेल सँटनर खेळताना दिसेल.

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह

15:02 (IST) 4 Apr 2026
MI vs DC Toss: कोणी जिंकली नाणेफेक?

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्याची नाणेफेक दिल्लीने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. कॅप्टनसह मुंबईच्या संघात ४ मोठे बदल कऱण्यात आले आहेत.

15:01 (IST) 4 Apr 2026
DC vs MI live: मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलला

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यात मुंबईचं नेतृत्त्व हार्दिक पंड्या नव्हे तर वर्ल्डकप विनिंग कर्णधार सूर्यकुमार यादव करणार आहे. आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळताना दिसणार नाही. हार्दिकची तब्येत ठिक नसल्याने तो या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती सूर्यकुमार यादवने नाणेफेकीदरम्यान दिली आहे.

14:50 (IST) 4 Apr 2026

DC vs MI live: नाणेफेक

आयपीएल २०२६ मधील पहिला डबल हेडर आज खेळवला जात आहे. यामधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून ३ वाजता सामन्याची नाणेफेक होणार आहे.

14:48 (IST) 4 Apr 2026

MI vs DC live: दिल्ली-मुंबईत लढत

आयपीएल २०२६ चा आठवा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे, ज्यात यजमान दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. दोन्ही संघांनी विजयाने हंगामाची सुरुवात केली असून, आता त्यांच्याकडे सलग दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.

IPL 2026 DC vs MI Highlights: दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का देत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे.