क्रिकेट सामन्यातील सुपर ओव्हरचा थरार तर पाहण्यासारखा असतो. दोन्ही संघांची सामना जिंकण्याची चुरस त्यात गोलंदाज आणि फलंदाजांची रणनिती होणाऱ्या धावा हे पाहण्यासारखं असतं. अशीच सुपर ओव्हर सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या कॅरेबियन लीगमध्ये पाहायला मिळाली. या सुपर ओव्हरमध्ये एका संघाच्या फलंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि यामागचं कारण म्हणजे सुपर ओव्हरमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देणारी ती फलंदाज फक्त क्रिकेटपटू नाही तर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ॲथलिट आहे, जिचं नाव डिएंट्रा डॉटिन आहे.

हेही वाचा – जय शाह यांची मोठी घोषणा; BCCIकडून भारतीय क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, बक्षीस रक्कम जाहीर

India Clinch Historic Gold at 45th Chess Olympiad 2024 as Arjun Erigasi and D Gukesh Wins Their Matches
Chess Olympiad 2024: भारताने ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक, चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशची चमकदार कामगिरी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Virat Kohli Naagin Dance Video Viral He Mocks Bangladesh with Snake Pose in IND vs BAN
VIDEO: विराट कोहलीचा फिल्डिंग करतानाचा नागिन डान्स व्हायरल, बांगलादेशला त्यांच्याच स्टाईलमध्ये चिडवलं?
Rohit Sharma Gets Angry on Teammates Stump Mic Video Viral In IND vs BAN
VIDEO: “ओए, सगळेजण झोपलेत का…”, भडकलेल्या रोहितने मैदानात खेळाडूला घातली शिवी, स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
jannik sinner defeats taylor fritz in straight sets to win us open 2024 men title
सिन्नेरला जेतेपद : पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय
Asian Champions Trophy 2024 IND vs JAP India Hocket Team beat Japan by 5 1 Score
Asian Champions trophy 2024: पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर भारताच्या हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरू, चीननंतर जपानचा ५-१ च्या फरकाने पराभव

WCPL 2024 महिला कॅरेबियन प्रीमियर लीगच्या चौथ्या सामन्यात खेळताना डिएंट्रा डॉटिनने संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. त्रिनबागो नाइट रायडर्ससमोर गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचे आव्हान होते. या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १२८ धावा केल्या. नाइट रायडर्सला इथपर्यंत नेण्यात डिएंट्रा डॉटिनचा मोठा वाटा होता, तिने अवघ्या ३८ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ५३ धावा केल्या.

हेही वाचा – India Squad for Women’s T20WC: टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, श्रेयांका पाटीलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह, पाहा संपूर्ण संघ

३३ वर्षीय डिएंट्रा डॉटिनच्या अप्रतिम खेळीमुळे नाईट रायडर्सने ॲमेझॉन वॉरियर्सला १२९ धावांचे लक्ष्य दिले, तेही पार करण्यात ते अपयशी ठरले. त्यांचा फलंदाज एरिन बर्न्सने ५० चेंडूत खेळलेल्या ६१ धावांच्या खेळीमुळे त्यांनी २० षटकांत ५ विकेट गमावत १२८ धावा केल्या. अशाप्रकारे २० षटकांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला.

हेही वाचा – Sunil Gavaskar on Jay Shah: ‘जय शाह ICC चे अध्यक्ष झाले तर भारतीय क्रिकेट…” सुनील गावसकरांचे शाह यांच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य

सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. जिथे पुन्हा एकदा डिएंट्रा डॉटिनची वादळी खेळी पाहायला मिळाली. तर सुपर ओव्हरचे उर्वरित २ चेंडू भारतीय फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जने खेळले, जिने एका चौकारासह ६ धावा केल्या. अशाप्रकारे त्रिनबागो नाईट रायडर्सने सुपर ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता १९ धावा केल्या. त्यामुळे आता गयाना ॲमेझॉन वॉरियर्ससमोर २० धावांचे लक्ष्य होते. पण, सुपर ओव्हरमध्ये त्यांनी अवघ्या ५ धावांत आपले दोन्ही विकेट गमावले. अशाप्रकारे त्रिनबागो नाइट रायडर्सने गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा पराभव केला आणि WCPL 2024 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांमध्ये पहिला विजय नोंदवला.

सुवर्णपदक विजेती भालाफेकपटू क्रिकेटर डिएंट्रा डॉटिन

डिएंट्रा डॉटिन ही त्रिनबागो नाईट रायडर्सच्या विजयाची शिल्पकार ठरली. डिएंट्रा एक उत्कृष्ट ॲथलीट राहिली आहे, जिने क्रिकेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ॲथलेटिक्सच्या मैदानावर यशस्वी कामगिरी केली. तिने वयाच्या १३-१४ व्या वर्षी ज्युनियर स्तरावर भालाफेक आणि गोळाफेक यांसारख्या ॲथलेटिक्स स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये, तिने सीएसी ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक आणि गोळाफेक या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर तिने २० वर्षांखालील कॅरिफ्टा गेम्समध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.