scorecardresearch

दीपक चहरच्या डोळ्यादेखत माकडाने पळवली भलतीच गोष्ट; VIDEO होतोय व्हायरल

Deepak Chahar shared a video: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याच्या रुममधून एका माकडाने एक वस्तू पळवल्याचे दिसत आहे.

Deepak Chahar shared a monkey video
दीपक चहर (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारतीय क्रिकेटर दीपक चहर सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. दुखापतीमुळे तो जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. सध्या तो ऋषिकेशमध्ये आहे जिथे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. मात्र, इथेही चहरला चैन नाही. इथेही चहरची शांतता भंग करण्यासाठी कोणीतरी पोहोचले आहे. चहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर चाहत्यांना त्याच्यासोबत घडलेल्या या मजेदार घटनेबद्दल सांगितले.

चहरने व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की त्याने एका नवीन पाहुण्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो तसे करू शकला नाही. उलट, न बोलवता आलेल्या पाहुण्याने दीपकच्या खोलीतील एक वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. चहरला लुटणारा दुसरा तिसकरा कोणी नसून माकड आहे. या माकडाने चहरचा फोन, पैसे न चोरता दोन केळी चोरली आहेत.

चहरने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक माकड त्याच्या हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत बसले होते. चहर माकडाला म्हणाला, ‘अजून खाणार का?’ फास्ट बॉलरने त्याला एक सफरचंद दिले आणि परत खोलीत आला. मात्र, त्यांच्या मागे माकडही खोलीत आले आणि टेबलावर ठेवलेली केळी घेऊन गेले. दीपकने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याने माझे सामान लुटून गेला. हे माझ्यासोबत नेहमीच घडते. हॅशटॅश बजरंगबली.”

दीपक चहरने शेअर केलेला व्हिडिओ

दीपक चहर द कपिल शर्मा शोमध्ये दिसणार आहे –

ऋषिकेशच्या आधी दीपक चहर मुंबईत होता, जिथे तो कपिल शर्मा शोमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. चहर आणि त्याची पत्नी जया भारद्वाज यांनी कपिल शर्मासोबत फोटोसाठी पोज दिली. कॅप्शनमध्ये चहरने सांगितले की, लवकरच तो एक नवीन अॅप लॉन्च करणार आहे. हा भाग १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे म्हणून प्रसारित केला जाईल. या एपिसोडमध्ये दीपक-जया व्यतिरिक्त माजी भारतीय क्रिकेटर सुरेश रैना, त्याची पत्नी प्रियंका आणि आकाश चोप्रा देखील त्याच्या पत्नीसोबत दिसणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो अद्याप रिलीज झालेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 16:24 IST