भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकला नाही. कांस्यपदकाची लढत त्याने गमावली. त्यानंतर दीपकचे विदेशी प्रशिक्षक मोराड गेद्रोव्ह यांच्याबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. गेद्रोव्ह यांना ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यात आले आहे. गुरुवारी दीपकच्या सामन्यानंतर गेद्रोव्ह यांनी रेफरीला मारहाण केल्याचे समोर आले आहे. मोराड गेद्रोव्ह हे मूळचे रशियाचे आहेत.

दीपक पुनियाचा ८६ किलो वर्गाच्या सामन्यात सॅन मॅरिनोच्या नाजेम मायलेस एमिने याने पराभव केला. या सामन्यानंतर गेद्रोव्ह यांनी रेफरीच्या खोलीत जाऊन त्यांच्यावर हल्ला केला. वर्ल्ड रेसलिंग बॉडी (FILA) ने लगेच ही बाब IOCला कळवली आणि भारतीय कुस्ती महासंघालाही शिस्तभंगाची सुनावणी करता बोलावण्यात आले. महासंघाने याबाबत माफी मागितली आणि त्यांना वॉर्निंग दिली. गेद्रोव्ह यांना टर्मिनेट करण्यात आले आहे.

 

कोण आहेत गेद्रोव्ह?

गेद्रोव्ह स्वतः कुस्तीपटू होते. त्यांनी २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला केला होता. आता IOCनेही त्यांची मान्यता रद्द केली आहे. गेद्रोव्ह यांना लगेचच ऑलिम्पिक व्हिलेज सोडण्यास सांगितले गेले आहे.

हेही वाचा – जिमी @ 39 : पिक्चर अभी बाकी है…!

दीपकने चांगल्या ड्रॉचा फायदा घेत उपांत्य फेरी गाठली, पण उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलरकडून तो पराभूत झाला. त्याने यापूर्वी नायजेरियाच्या एकेरेक्मे इगिओमोरला तांत्रिक आणि नंतर उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जुशेन लिनला हरवले होते. 6-3 ने पराभूत केले होते.