Deepti Sharma Run Out Viral Video: इंग्लंड-भारत एकदिवसीय सामन्यात दिप्ती शर्माने नॉन-स्ट्रायकरला धाव बाद केल्यावर सोशल मीडियावर दिप्ती विरुद्ध चार्ली डीन समर्थक यांच्यात मोठा वाद पाहायला मिळाला. दिप्तीने धावबाद केल्यावर चार्ली अक्षरशः मैदानातच रडली होती. मात्र याच्या दुसऱ्याच दिवशी लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी २०२२ दरम्यान चार्लीने असे काही केले की ज्यावरून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. असं नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात..

दिप्ती शर्माने चार्लीला कसं बाद केलं होतं?

भारताविरुद्धच्या अंतिम आंतरराष्ट्रीय सामन्यात 170 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था ९ बाद ११९ अशी होती परंतु चार्ली डीन व शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिस यांनी उत्तम खेळीने सामना पुन्हा एकदा रोमहर्षक टप्प्यावर आणला. या जोडीने १५३ पर्यंत मजल मारली. इतक्यात दिप्ती शर्मा या भारतीय ऑफस्पिनरने ४४ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नॉन स्ट्रायकरला डीनला बाद केले. दिप्तीने आयसीसीच्या नियमानुसार जरी डीनला बाद केले असले तरी अनेकांनी हे खेळाचे स्पिरिट नाही म्हणत तिच्यावर टीका केली होती.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Hardik Pandya Rohit Sharma
हार्दिकचे कर्णधारपद धोक्यात? क्रिकेटवर्तुळात चर्चा; माजी क्रिकेटपटूंमध्ये मतमतांतरे

या प्रकरणानंतर डीनने चांगलाच धडा घेतला आहे. लॉर्ड्सवरील या सामन्याची आठवण शेअर करताना चार्ली डीनने एक खास इंस्टाग्राम पोस्टही शेअर केली आहे ज्यात कॅप्शनमध्ये ती म्हणते, ” कदाचित या पुढे मी माझी क्रीझ सोडून कधीच जाणार नाही”

दरम्यान या सामन्यानंतर सदर्न वायपर्सकडून खेळताना, डीनने इंग्लंडच्या महिला देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेतील निर्णायक सामन्यात नॉर्दर्न डायमंड्सविरुद्ध आठव्या षटकात गोलंदाजी केली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजी करताना, लिन्से स्मिथला नॉन-स्ट्रायकरच्या चार्लीने सूचना दिली होती मात्र तरीही स्मिथ न ऐकल्याने चार्लीने तिला नॉन स्ट्रायकरलाच बाद करण्याचे नाटक केले, आपल्या मिळालेला धडा गंमतीत इतर खेळाडूंना शिकवण्याच्या या कृतीमुळे मैदानात अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

चुकीला माफी नाही; शार्ली डीनने ७२ वेळा क्रीझ सोडलं होतं, ७३व्या वेळी दिप्तीने केलं बाद!

चार्ली डीन व दिप्ती शर्मा या वादात अनेकांनी दिप्तीवर आगपाखड केली असली तरी भारतीय क्रिकेटप्रेमी व खेळाडूंनी तिची पाठराखण केली होती. मायदेशी परत आल्यावर मीडियाशी संवाद साधताना दिप्तीनेसुद्धा आपण आधीच चार्लीला सूचना केल्या होत्या पण तिने वारंवार हीच चूक केल्याने नियमात राहून बाद केले आहे असे सांगितले.