भारताविरुद्ध पराभव कारकीर्दीसाठी दिशादायी!

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक लँगर यांचे प्रतिपादन

संग्रहित छायाचित्र

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने मायदेशात पत्करलेल्या कसोटी मालिके तील अनपेक्षित पराभवामुळे मला खडाडून जाग आणली. तो माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीतील दिशादायी क्षण ठरला, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी के ले.

ऑस्ट्रेलियाच्या क्रि के टला काळिमा फासणाऱ्या चेंडू फे रफारप्रकरणी तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिन वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट दोषी आढळल्यानंतर मे २०१८मध्ये लँगरकडे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले. मातब्बर फलंदाजांच्या अनुपस्थितीत सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या संघाला झगडावे लागले. याच कालखंडात ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध मायदेशात मालिका गमावण्याची नामुष्की पत्करावी लागली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली.

‘‘माझ्या आयुष्यातील तो सर्वात खडतर काळ होता. गेल्या दहा वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत प्रथमच हा धक्कादायक अनुभव घेतल्याने खडाडून जाग आली,’’ असे ४९ वर्षीय लँगर यांनी सांगितले. २००१मध्ये अ‍ॅशेस मालिके च्या सुरुवातीला वगळल्यानंतर ते अपयश पचवणे मला अत्यंत कठीण गेले होते. मग मॅथ्यू हेडनच्या साथीने डावाला प्रारंभ करण्याची मिळालेली संधी कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली, अशी आठवणही लँगर यांनी सांगितली. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी सलामीवीर म्हणून नाव कमावणाऱ्या लँगरने २३ पैकी १६ शतके  डावाला प्रारंभ करूनच साकारली आहेत.

‘‘कठीण परिस्थिती आयुष्यात धडा घेण्याची संधी देतात. या वेळी गोंधळून जाण्याची आवश्यकता नसते. यातून तावून सुलाखून निघालात तरच उत्तम व्यक्तिमत्त्व घडते,’’ असा सल्ला लँगर यांनी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Defeat against india is conducive to a career abn