पेस, सानिया पराभूत

भारताच्या लिएण्डर पेस व सानिया मिर्झा यांना एगॉन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष दुहेरी व महिला दुहेरीत पराभवाचा धक्का बसला आहे.

भारताच्या लिएण्डर पेस व सानिया मिर्झा यांना एगॉन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष दुहेरी व महिला दुहेरीत पराभवाचा धक्का बसला आहे.
उपांत्यपूर्व फेरीत फिलिपाइन्सचा ट्रीट ह्य़ुई व इंग्लंडचा डॉमिनिक इंगलोट यांनी पेस-कुरेशी जोडीवर ६-३, ६-४ अशी मात केली. तैपेईच्या हाओचिंग चान व युआन जानचान जोडीने सानिया व कारा ब्लॅक या जोडीवर १-६, ६-३, १०-७ असा विजय मिळवला. विम्बल्डन स्पर्धेत सानिया-कॅरा जोडीला चौथे तर पेस-स्टेपानेक जोडीला पाचवे मानांकन देण्यात आले आहे.
    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Defeats for sania mirza and leander paes