हैदराबाद : पंकज मोहिते आणि मोहित गोयत (प्रत्येकी चार गुण) यांनी चढाईत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर गौरव खत्रीने (सात गुण) बचावात दाखवलेल्या चपळाईच्या जोरावर गतविजेत्या पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामाला विजयी सुरुवात केली. शनिवारी झालेल्या लढतीत त्यांनी गतउपविजेत्या हरियाणा स्टीलर्स संघाला ३५-२५ अशा फरकाने नमवले.

हेही वाचा >>> श्रेयसच्या शतकामुळे मुंबईचा दबदबा ; दुसऱ्या डावात ऋतुराजकडून प्रतिकार; पण महाराष्ट्र १७३ धावांनी पिछाडीवर

Why Shiv Sainik Dug Wankhede Pitch in 1991 by Orders of Balasaheb Thackrey Before India vs Pakistan Match
Wankhede Stadium: बाळासाहेबांचा इशारा अन् शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं, पाकिस्तान बरोबरच्या ‘त्या’ सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
member registration campaign BJP
वर्धा : भाजपसाठी ‘ ५ ‘ तारीख महत्वाची; नेते, पदाधिकारी कामाला लागले
youth pistols Marathwada marathi news
सत्ता, श्रीमंती मिरवण्यासाठी कंबरेला पिस्तूल, बीडसह संपूर्ण मराठवाड्यात लाखोंची ‘हौस’
BJP Nitesh Rane kerala mini pakistan statement
नितेश राणे यांच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार ?

हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. मात्र, १३व्या मिनिटाला पुणेरी संघाने हरियाणावर पहिला लोण चढवत १३-७ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला पुणेरी संघाकडे १९-१३ अशी आघाडी होती. पहिल्या सत्रात पुणेरीकडून अस्लम ईनामदार, पंकज आणि मोहित गोयत यांनी चमक दाखवली. दुसऱ्या सत्रात हरियाणा संघाने आपला खेळ उंचावला. मात्र, पुणेरी संघाने सामन्याला दोन मिनिटे शिल्लक असताना हरियाणावर दुसरा लोण चढवत विजय निश्चित केला. त्यापूर्वी, दिवसाच्या पहिल्या सामन्यात तमिळ थलायवाजने यजमान तेलुगू टायटन्स संघाला ४४-२९ असे पराभूत केले. मध्यंतराला तमिळकडे २०-१७ अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात तमिळ संघाने आपला खेळ आणखी उंचावला आणि तेलुगूला सामन्यात पुनरागमनाची संधी दिली नाही. तमिळ संघाने सामन्यात तेलुगूवर दोन लोण चढवले. तमिळकडून नरेंदर होशियार आणि सचिन (१० गुण) यांनी चढाईत चमक दाखवली. साहिलने (५ गुण) बचावात चांगली कामगिरी केली. तेलुगूकडून पवन सेहरावत (१० गुण) आणि विजय मलिक (९ गुण) यांनाच झुंज देता आली.

Story img Loader