नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १८ वा सामना झाला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांची दिल्लीच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. मारिझान कापने भेदक गोलंदाजी करून मुंबईच्या सलामीवर फलंदाज यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजला स्वस्तात माघारी पाठवलं. त्यानंतर सिवर ब्रंट,अमेलिया केरलाही धावांचा सूर गवसला नाही. पूजा वस्त्रकर, वॉंग आणि कर्णधार हरमप्रीतच्या सावध खेळीमुळं मुंबईची धावसंख्या शंभरी पार झाली अन् दिल्लीला १०७ धावांचं आव्हान मिळालं. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीने मुंबईच्या गोलंदाजांचा धु्व्वा उडवला आणि या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. शफाली वर्माने सुरुवातीलाच स्फोटक फलंदाजी केली. शफालीने १५ चेंडूत ३३ धावा कुटल्या. तर कर्णधार मेग लॅनिंग आणि एलिस केपसीनेही आक्रमक खेळी करत दिल्लीला विजयाच्या दिशेनं नेलं. मेगने २२ चेंडूत ३२ तर एलिसने १७ चेंडूत ३८ धावा कुटल्या. त्यामुळे दिल्लीने फक्त ९ षटकात ११० धावांचं लक्ष्य गाठून मुंबई इंडियन्सचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर दिल्लीने भेदक मारा केला. मारिझान कापने मुंबईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. मारिझान काप, शिखा पांडे आणि जेस जोनासने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मुंबईने २० षटकांत ८ बाद १०९ धावाच केल्या. त्यामुळं दिल्लीला विजयासाठी ११० धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं. यास्तिका भाटिया फक्त १ धाव करून तंबूत परतली. त्यानंतर हेलीही कापच्या गोलंदाजीवर बाद झाली. हेलीला १० चेंडूत फक्त ५ धावाच करता आल्या. कापने सिवर ब्रंटला भोपळाही फोडू दिला नाही. सिवर कापच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने सावध खेळी करत २६ चेंडूत २३ धावा केल्या. पण तिलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शिखा पांडेच्या गोलंदाजीवर कौर बाद झाली. त्यानंतर पूजा वस्त्रकरने मुंबईची कमान सांभाळली. पूजाने १९ चेंडूत २६ धावा केल्या. इस वॉंगने २४ चेंडूत २३ धा