Shikha Pandey Jaw Dropping Catch Viral Video : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिल्सच्या यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. या लीगचा आज ११ वा सामना खेळवला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बंगळुरु संघाची सुरुवात खराब झाली. कारण दिल्लीची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने भेदक मारा करून बंगळुरुच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं.

शिखाने ४ षटकांत २३ धावा देऊन ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केलीच. पण तारा नॉरिसच्या गोलंदाजीवर हेदर नाईटने स्केअर लेगच्या दिशेनं चेंडू मारला अन् हवेत उडी मारून शिखाने हेदरला झेलबाद केलं. शिखाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहून खेळाडूंसह स्टेडियममधील प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. शिखाच्या फिल्डिंगचा हा व्हिडीओ वुमन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Fact check
Fact Check : प्रचारादरम्यान भाजपा नेत्यावर हल्ला? VIDEO होतोय व्हायरल, जाणून घ्या नेमकं खरं काय…
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा

नक्की वाचा – WPL मध्ये DRS निघाला ब्लंडर! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही…Video पाहून विश्वासच बसणार नाही

इथे पाहा व्हिडीओ

दिल्लीची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने भेदक मारा करून बंगळुरुच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. गेल्या काही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या स्मृती मंधाना पॉवर प्ले सुरु असतानाच तंबूत परतली. १५ चेंडूत ८ धावांची खेळी करत मंधाना शिखाच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर सोफी डिवाईनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण सोफीलाही बाद करण्यात शिखा यशस्वी झाली. सोफीन १९ चेंडूत २१ धावा केल्या. त्यानंतर तारा नॉरीसच्या गोलंदाजीनं हेदर नाईटला जखडून टाकलं.

हेदरने १२ चेंडूत ११ धावा केल्या. हेदरने स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेल्या चेंडूवर शिखा पांडेने अप्रतिम झेल घेतला. हवेत उडी मारून जबरदस्त झेल घेत हेदरला तंबूत पाठवण्यात आलं. शिखाने पांडेने ४ षटकात २३ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. वुमन्स प्रीमियर लीग सुरु झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला आतापर्यंत झालेल्या एकाही सामन्यात विजय मिळवत आला नाही. तर दिल्लीने चारपैकी तीन सामन्यात विजय मिळवून ६ गुण मिळवले आहेत.