Delhi Capital Women Wins Against RCB Women : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कपिटल्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा रंगतदार सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बंगळुरु संघाची सुरुवात खराब झाली. कारण दिल्लीची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने टिच्चून मारा केला. त्यामुळं बंगळुरुला २० षटकांत ४ गडी गमावत १५० धावांवर मजल मारता आली. त्यानंतर विजयासाठी १५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली फलंदाजांच्याही बंगळुरुच्या गोलंदाजांनी नाकीनऊ आणले होते. पण जेमिमा रॉड्रिग्जने चौफेर फटकेबाजी करून २८ चेंडूत ३२ धावा कुटल्या. आशा शोभनाच्या गोलंदाजीवर जेमिमा बाद झाली. त्यानंतर मारिझान काप आणि जेस जोनासनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा पराभव केला. मारिझान काप ३२ चेंडूत ३२ धावा तर जेस जोनासन १५ चेंडूत २९ धावांवर नाबाद राहिली.

यूपी वॉरियर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात झुंझार खेळी करणाऱ्या शफाली वर्माला आजच्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. मेगनने शफालीचा शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर कर्णधार मेग लेनिंगही अवघ्या १५ धावांवर असताना आशा शोभनाच्या गोलंदाजीवर बाद झाली. पण अॅलि कॅप्सेनं दिल्लीचा डाव सावरत २४ चेंडूत ३८ धावा केल्या. त्यानंतर प्रितीच्या गोलंदाजीवर अलिस बाद झाली. मात्र, मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्जने मात्र आक्रमक फलंदाजी केली. आरसीबीसाठी गोलंदाज आशा शोभनाने २ विकेट घेतल्या. प्रिती बोसन आणि मेगनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: दिल्लीविरूद्ध अवघ्या ५३ चेंडूतील पराभवानंतर शुबमन गिल भडकला, गुजरातच्या कर्णधाराने कोणावर फोडले पराभवाचे खापर
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: पंजाब कब जिता है? शशांक सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबची गुजरातवर मात
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Match UpdateS
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव

कर्णधार स्मृती मंधानाला या सामन्यातही धावांचा सूर गवसला नाही. दिल्लीच्या शिखा पांडेच्या गोलंदाजीवर मंधाना ८ धावांवर असताना झेलबाद झाली. एलिस पेरीने चौफेर फटकेबाजी करून अर्धशतकी खेळी केली. तसंच रिचा घोषनेही आक्रमक खेळी करत बंगळुरुच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. पंरतु, १६ चेंडूत ३८ धावांची खेळी करत रिचा शिखाच्या गोलंदाजीवर बाद झाली. पेरीने ५२ चेंडूत ६७ धावा कुटल्या. त्यामुळे २० षटकांत बंगळुरुला १५० धावांपर्यंत मजल मारता आली.

दिल्लीची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने भेदक मारा करून बंगळुरुच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. गेल्या काही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या स्मृती मंधाना पॉवर प्ले सुरु असतानाच तंबूत परतली. १५ चेंडूत ८ धावांची खेळी करत मंधाना शिखाच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर सोफी डिवाईनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण सोफीलाही बाद करण्यात शिखा यशस्वी झाली. सोफीन १९ चेंडूत २१ धावा केल्या. त्यानंतर तारा नॉरीसच्या गोलंदाजीनं हेदर नाईटला जखडून टाकलं. हेदरने १२ चेंडूत ११ धावा केल्या. हेदरने स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेल्या चेंडूवर शिखा पांडेने अप्रतिम झेल घेतला.