नवी दिल्ली :बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आलेला उंच उडीपटू तेजस्विन शंकरच्या कामगिरीचा गुणवत्तेनुसार विचार करावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स निवड समितीला दिले आहेत.

वरिष्ठ राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग न घेणे, हा संघनिवडीसाठी एकमेव निकष ठरू शकत नाही. पदकाची खात्री असलेल्या खेळाडूंबाबत अहंकार आड येऊ देता कामा नये, असे मत न्यायालयाने मांडले आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि निवड समिती यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय महाविद्यालयीन अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या अजिंक्यपद स्पर्धेत तेजस्विनने पात्रता निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्याला स्पर्धेत सहभागासाठी भारतीय संघात स्थान द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Court Grants Pre Arrest Bail, Rashtriya Swayamsevak Sangh, name misusing Case, rss name misusing Case, Pre Arrest Bail, rss, marathi news, nagpur news,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग, न्यायालय म्हणाले…
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
exam, exam paper
परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; आता २ ते ४ एप्रिलऐवजी ४ ते ६ एप्रिल दरम्यान परीक्षा
Senior Men National Kabaddi Tournament from today Maharashtra vs Gujarat Kabaddi match sport news
महाराष्ट्राची सलामी गुजरातशी; वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आजपासून