मनिकाने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमध्ये दोन न्यायाधीश आणि एका खेळाडूचा समावेश आहे.

नवी दिल्ली : आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने राष्ट्रीय प्रशिक्षकांवर सामना निश्चिती करण्याची सूचना दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.

भारतीय टेबल टेनिस महासंघाने निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, असे न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी सुनावणीत म्हटले आहे. मनिकाने संघटनेकडून वैयक्तिकरीत्या लक्ष्य केले जात असल्याचे याचिकेत म्हटले होते. टेबल टेनिस महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही तिने केली आहे.

उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमध्ये दोन न्यायाधीश आणि एका खेळाडूचा समावेश आहे. या समितीला चार आठवडय़ात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी मनिकाला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. वैयक्तिक मार्गदर्शन करीत असलेल्या खेळाडूला संधी मिळावी, म्हणून ऑलिम्पिक पात्रता सामन्यात पराभूत होण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांनी दडपण् आणल्याचा आरोप मनिकाने केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi hc form 3member committee into manika batra s allegation of match fixing zws

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या