मनिकाला ‘क्लीन चिट’ द्या ! उच्च न्यायालयाचे टेबल टेनिस महासंघाला आदेश

‘महासंघाच्या कारभाराबाबत मी समाधानी नाही. तुम्ही एका व्यक्तीची कोणत्याही कारणाशिवाय चौकशी करत आहात.

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय टेबल टेनिस महासंघाला खडे बोल सुनावताना आघाडीची खेळाडू मनिका बत्राला ‘क्लीन चिट’ देण्याचे आदेश दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात अनिवार्य हजेरीच्या महासंघाच्या नियमाबाबत आव्हान देणारी याचिका मनिकाने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याआधी तिने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर सामनानिश्चितीसाठी दडपण टाकल्याचाही आरोप केला होता.

‘‘महासंघाच्या कारभाराबाबत मी समाधानी नाही. तुम्ही एका व्यक्तीची कोणत्याही कारणाशिवाय चौकशी करत आहात. तिने वैयक्तिक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन कोणतीही चूक केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खेळाडूंना न्यायालयात धाव घ्यावी लागणे हे देशासाठी योग्य नाही. तुम्ही कोणत्याही चौकशीविना तिला ‘क्लीन चिट’ दिली पाहिजे,’’ असे न्यायमूर्ती रेखा पल्ली म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi hc suggests giving clean to manika batra zws