दिल्ली पोलिसांनी पूर्व दिल्लीतील भाजपा खासदार आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्याकडे आपल्या भागात फॅबीफ्लू औषध वितरणासाठी उत्तर मागितले आहे. काही काळापूर्वी फॅबीफ्लू औषध खासदारांच्या कार्यालयात वितरित केले जात होते, त्यामुळे ही औषधे दिल्लीच्या रूग्णालयात आणि इतरत्र उपलब्ध नव्हती. याबाबत दिल्ली पोलिसांकडेही तक्रार दाखल झाली होती. तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी यायाबाबत उत्तर मागितले आहे
या प्रकरणानंतर गौतम गंभीर म्हणाला, ”आम्ही दिल्लीच्या जनतेची सेवा करत राहू. औषध पाठविणे व वितरणाची सर्व नोंदी माझ्याकडे आहेत. या नोंदी उपलब्ध करून दिल्या जातील.”
Delhi Police seek a reply from BJP MP from East Delhi, Gautam Gambhir over the distribution of Fabiflu drug
“We’ve provided all details. I will keep serving Delhi & its people to the best of my abilities always,” he says.
(file photo) pic.twitter.com/WcWqByPDka
— ANI (@ANI) May 14, 2021
औषधाचे वितरण जागृती एन्क्लेव्ह येथील कार्यालयात करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही औषधे लोकांनी दिली जात होती. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसमवेत त्या व्यक्तीचे आधार कार्डही घेतले जात होते. ”संसदीय मतदारसंघातील प्रत्येक गरजू व्यक्तीला हे औषध मिळावे हा प्रयत्न होता”, असे गंभीरने सांगितले.
दिल्लीत करोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना औषधांचा तुटवडा होता. गौतम गंभीर लोकांना फबिफ्लू नावाची औषधे लोकांना विनामूल्य पुरवत असताना इतर लोक या औषधासाठी भटकत होते. गंभीरने हे औषध २६० लोकांना उपलब्ध करून दिले. ”करोना संक्रमित रूग्णांना फॅबीफ्लू औषधे दिली जात आहेत, बाजारात या औषधाची कमतरता आहे. ज्या लोकांना करोनाची तीव्र लक्षणे आहेतw त्यांना हे औषध दिले जाते. हे औषध बाजारात मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे गरजू लोकांना हे औषध दिले जात होते”, असे गंभीरने सांगितले.
काय आहे हे फॅबीफ्लू औषध?
फॅबीफ्लू हे एक अँटीव्हायरल औषध आहे हे प्रौढांमध्ये सौम्य ते गंभीर करोना व्हायरसच्या उपचारात वापरले जाते. हे व्हायरसला प्रजनन आणि वाढत असलेल्या अनेक पटींपासून प्रतिबंधित करते आणि अशा प्रकारे शरीरातील विषाणूचे प्रमाण कमी करते.