Rashid Khan, World Cup 2023: अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मिळालेला पाठिंबा पाहून थक्क झाला. रविवारी रात्री इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात या मैदानावर एक सामना खेळला गेला जिथे अफगाण संघाने विश्वचषक २०२३ मधील सर्वात मोठा सर्वांना आश्चर्यचकित करणारा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षक अफगाणिस्तानला साथ देताना दिसले, तर राशिद खान जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा दिल्लीतील लोकांनी त्याच्या नावाने घोषणाबाजी करत त्याचा आत्मविश्वास वाढवला. इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान दिल्लीत मिळालेले हे प्रेम पाहून राशिद थोडा भावूक झाला. त्याने आज म्हणजेच १६ ऑक्टोबर रोजी त्याने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट करून दिल्लीतील चाहत्यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले. यावेळी तो म्हणाला की, “दिल्ली खरोखरच दिल्लीकरांची आहे.” राशिद खानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'दिल्ली खरंच मोठ्या मनाच्या लोकांची आहे. त्यांनी सर्वांना सामावून घेतले. स्टेडियममधील सर्व चाहत्यांचे मनःपूर्वक आभार ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि संपूर्ण सामन्यामध्ये प्रोत्साहन देत आमची मदत केली. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी दिल्ली आणि जगभरातील सर्व क्रिकेट समर्थकांचे आभार.” या काळात केवळ राशिद खानच नाही तर अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनाही दिल्लीतील लोकांचा पाठिंबा मिळाला. जेव्हा नवीन-उल-हकने इंग्लिश कर्णधार जोस बटलरला गोलंदाजी दिली तेव्हा चाहत्यांनी त्याने घेतलेल्या विकेटचे खूप कौतुक केले. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यानंतर भारतीय चाहते नवी-उल-हकचे समर्थन करताना दिसले. वास्तविक, आयपीएल दरम्यान कोहली आणि नवीन यांच्यात झालेल्या भांडणानंतर भारतीय चाहते नवीनच्या विरोधात नेहमीच घोषणाबाजी करताना दिसत होते. मात्र, जेव्हापासून कोहलीने चाहत्यांना तसे करण्यास मनाई केली आणि दोघांमधील जुन्या गोष्टी संपल्या तेव्हापासून चाहते नवीनला सपोर्ट करत आहेत. हेही वाचा: Danish Kaneria: “पाकिस्तान संघात धार्मिक भेदभाव नेहमीचाच” दानिश कनेरियाने जुना व्हिडीओ शेअर करत केला गंभीर आरोप अफगाणिस्तानकडून इंग्लंडचा पराभव कसा झाला? अफगाणिस्तान संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाज (८०) आणि इक्रम अलीखिल (५८) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २८४ धावा केल्या. अफगाणिस्तान संघ निर्धारित ५० षटकांच्या आता सर्वबाद झाला. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. २८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला इंग्लिश संघ सुरुवातीपासूनच मागे पडल्याचे दिसत होते. ३ धावांवर इंग्लंड संघाला पहिला धक्का जॉनी बेअरस्टोच्या रूपाने बसला. त्यानंतर पहिल्या पॉवरप्लेमध्ये संघाने जो रूटची विकेटही स्वस्तात गमावली. या सुरुवातीच्या धक्क्यातून इंग्लंड सावरण्यापूर्वीच अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी दबाव निर्माण सुरुवात केली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ६६ धावांची खेळी खेळली, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याच्याशिवाय एकाही इंग्लिश फलंदाजाला ४० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंडचा डाव ४०.३ षटकांत २१५ धावांत आटोपला आणि अफगाणिस्तानने हा सामना ६९ धावांनी जिंकला.