खेळाडूंच्या नव्या मागण्या भारतीय टेनिस संघटनेने धुडकावल्या

डेव्हिस चषक संयोजनाच्या मुद्दय़ावरून बंडखोरी करणाऱ्या टेनिसपटूंच्या नवीन मागण्याही अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) धुडकावून लावल्या आहेत. बंडखोर खेळाडूंनी आपली कार्यकारिणी तसेच निवड समितीत आपला समावेश करावा, अशी मागणी केली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेद्वारे त्यांनी राष्ट्रीय संघटनेत प्रवेश करावा, थेट प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका एआयटीएने घेतली आहे.

बंडखोर खेळाडूंचे नेतृत्व करणाऱ्या सोमदेव देववर्मनने आणखी एका मागणीसाठी आग्रह धरला आहे. एआयटीएने सध्याची कार्यकारिणी आणि निवडसमिती पुनर्गठित करावी आणि नव्या दोन समित्यांमध्ये ५० टक्के खेळाडूंचे प्रतिनिधित्व असावे, अशी मागणी केली होती.
डेव्हिस चषकाचे मानधन, प्रवासाकरिता प्रथम श्रेणीची सुविधा, सपोर्ट स्टाफमध्ये बदल या बंडखोर खेळाडूंच्या मागण्या एआयटीएने मान्य केल्या होत्या. मात्र टेनिस कोर्टचे स्वरूप आणि सामन्याचे ठिकाण याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार संघटनेने आपल्याकडे ठेवले होते.
आम्हाला या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढायचा आहे. मात्र खेळाडूंनी आडमुठी भूमिका घेतली आहे. काही व्यक्ती पडद्यामागून राजकारण खेळत आहेत, मात्र हे करताना अनेक खेळाडूंची कारकीर्द आपण धोक्यात आणत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही, असे एआयटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोमय चॅटर्जी यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Demand of insurgent tennis player are refused by ait